वाघोली : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या आशीर्वाद पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुद्वारा कॉलनी, भूकण वस्ती (लोहगाव) तसेच वाघोली येथील कावडे वस्ती, साई सत्यम पार्क, कोलते पार्क, गणेश पार्क आदी परिसरात ही पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या पदयात्रेत प्रभाग क्रमांक 3 गट अ मधील उमेदवार श्रेयस प्रीतम खांदवे, गट ब मधील अनिल दिलीप सातव, गट क मधील ऐश्वर्या सुरेंद्र पठारे आणि गट ड मधील रामदास दत्तात्रय दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रचार दौर्यात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तुमची-आमची भाजपा, सर्वांची अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत प्रश्न, आतापर्यंत झालेला विकास आणि भविष्यातील विकासाची स्पष्ट दिशा नागरिकांसमोर मांडली. यावेळी जनतेशी थेट संवाद साधत नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. या प्रचारादरम्यान नागरिकांनी चारही अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत, एकजुटीने त्यांना विजयी करण्याचा संकल्प केला. प्रभागातील प्रत्येक घराघराशी प्रभावी संपर्क साधत, लोकसहभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा समजून घेऊन कार्य करण्याची समाजसेवेची वाटचाल आजवर सुरू आहे. या कार्याची दखल घेत नागरिक जेव्हा आपला हक्काचा माणूस समजून विश्वासाने मताच्या माध्यमातून पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन देतात, तेव्हा नव्या ऊर्जा व सकारात्मकतेची जाणीव होते. -रामदास (रामभाऊ) दाभाडे, उमेदवार प्रभाग क्रमांक 3