Dipika Kakar: अभिनेत्री दीपिका कक्कड इब्राहिम सध्या लिव्हर कॅन्सरच्या उपचारांमधून जात आहेत. हा काळ त्यांच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर खूप कठीण ठरत आहे. उपचारांमुळे त्यांचे केस गळणे, वजन वाढणे, थकवा येणे असे दुष्परिणाम दिसत आहेत. तरीही दीपिका खंबीरपणे हा काळ पार करत आहेत. त्या म्हणतात, “पूर्ण बर व्हावं हेच सध्या माझं प्राधान्य आहे.” रिपोर्ट हातात घेताच कोसळली… पण लगेच स्वतःला सावरलं दीपिका नुकत्याच रश्मी देसाईच्या YouTube शो ‘दिल से दिल तक’ मध्ये दिसल्या. यावेळी त्यांनी आपल्या कॅन्सरच्या प्रवासाबद्दल पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलल्या. त्या म्हणाल्या, “ज्या दिवशी रिपोर्ट मिळाले, तेव्हा मी माझ्या मुलाला, रुहानला नीट सांभाळूही शकत नव्हते. कारमध्ये बसले होते, रुहान खूप रडत होता आणि मी त्याला फीडही करू शकत नव्हते. तेव्हा माझे डोळे पाणावले. मला वाटलं जर हे खरंच कॅन्सर असेल, तरीही मला कुठलीही तक्रार नाही… फक्त मी बरी व्हावं, एवढंच हवं होतं.” “कॅन्सर ऐकताच मन ढासळल, पण आम्ही दोघांनी एकमेकांना आधार दिला” दीपिका सांगतात, “कॅन्सर हा शब्द ऐकल्यावर माणूस आतून तुटतो. आम्ही लॉबीमध्ये खूप रडलो. पण मग मी आणि शोएबने ठरवलं की आता रडायचं नाही. आपण मजबूत व्हायला हवं.” उपचारांमुळे वजन वाढणे आणि लुक्स बदलण्याबद्दल त्यांनी स्पष्ट सांगितलं,“हो, माझं वजन वाढलं आहे, केस गळत आहेत… पण मला खरंच याची काहीच तक्रार नाही. मला फक्त बर व्हायचं आहे – विशेषतः माझ्या मुलासाठी.” हळूहळू बरी होत आहे दीपिका दीपिकाची कॅन्सर सर्जरी पूर्ण झाली आहे आणि सध्या त्या औषधांवर आहेत. उपचारानंतर त्या आपल्या सासरच्या घरी उत्तर प्रदेशात काही काळ विश्रांती घेत आहेत. तिथे त्या हळूहळू रिकव्हर होत आहेत.