Dipika Kakar : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कड गेल्या काही महिन्यांपासून लिव्हर कॅन्सरशी लढा देत आहे. उपचारांच्या या कठीण प्रवासात त्यांना अनेक साइड इफेक्ट्स, वेदना आणि मानसिक ताण सहन करावा लागत आहे. अलीकडेच त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी गेल्या असताना भावनिक झाल्या आणि रडू लागल्या. त्यांच्या नवऱ्याने, अभिनेता शोएब इब्राहिमने, त्यांना शांत करत सांभाळले. हा भावनिक क्षण दीपिकाने आपल्या नव्या व्लॉगमध्ये शेअर केला. डॉक्टरांना भेटताना भावूक झाल्या दीपिका दीपिका म्हणाल्या, “सगळं ठीक आहे, रिपोर्ट्सही नॉर्मल आहेत. पण मनात एक भीती असते की खरंच सगळं ठीक चाललंय ना… हा विचार कधी-कधी मनावर हावी होतो आणि अशावेळी स्वतःला सांभाळणं कठीण जातं.” अशाच क्षणी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले आणि शोएबने त्यांना आधार दिला. ३ जून २०२५ रोजी झाली मोठी सर्जरी दीपिकाचा लिव्हर कॅन्सर निदान झाल्यानंतर ३ जून रोजी त्यांची मोठी शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी त्यांच्या लिव्हरचा तब्बल २२% भाग काढून टाकला. सुदैवाने कॅन्सर फक्त लिव्हरपुरता मर्यादित असून शरीराच्या इतर भागांत पसरलेला नव्हता, ही दिलासादायक बाब त्यांनी सांगितली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या लिव्हरमध्ये ११ सेंटीमीटरचा मोठा ट्यूमर होता. उपचारांचे साइड इफेक्ट्स अजूनही जाणवत आहेत. रिपोर्ट्स नॉर्मल असले तरी उपचारांमुळे दीपिकाला सतत काही ना काही त्रास होत आहे. जसे की, थायरॉईड लेव्हल्स बदलणे, हार्मोन्समध्ये चढ-उतार, कान-घशात प्रेशर, त्वचा कोरडी होणे, घशात खवखव, दीपिका म्हणतात की शरीर रोज नवीन लढाई लढत आहे, पण त्या आशावादी आहेत. दोन वर्षे चालणार टार्गेटेड थेरपी दीपिका सध्या टार्गेटेड थेरपी घेत आहे, जी पुढील दोन वर्षे चालणार आहे. या उपचारामुळे शरीरात उरलेल्या कॅन्सर पेशींना पूर्णपणे नष्ट केले जाते, जेणेकरून कॅन्सर पुन्हा परतू नये. मात्र या थेरपीमुळे, केसगळती, तोंडात जखमा, थकवा यांसारखे त्रास जाणवतात. दीपिका या सर्वांशी लढते आहे. ‘आपण रोज एक पाऊल पुढे जातोय’ – दीपिकाची सकारात्मकता व्लॉगच्या शेवटी दीपिका म्हणाल्या,“दर दिवशी नवं काही होतंय, आणि आपण त्यासोबत पुढे जातोय. सगळं ठीक होईल, पण मनातला छोटासा भीतीचा आवाज कधी-कधी मोठा होतो.” तिच्या या प्रामाणिक आणि भावुक अपडेटने चाहत्यांच्या डोळ्यांतही पाणी आणलं असून सर्वजण तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.