FIDE World Chess Championship 2024 (D. Gukesh vs Ding Liren) :- जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय आव्हानवीर डी गुकेश आणि चीनचा गतविजेता डिंग लिरेन यांच्यातील आठव्या फेरीमधील सलग पाचवी लढत अनिर्णित राहिली. दोघांचेही समान गुण झाले आहेत. या ड्रॉनंतर, दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी 4 गुण आहेत.
Another day, another game which kept everyone on the edge of their seats. A very complex battle between Ding Liren and D Gukesh ended in a draw in Game 8 of the World Chess Championship!
The scores stay level 4-4. Gukesh has the White pieces in Game 9 tomorrow. #DingGukesh pic.twitter.com/IiQT7jhhUP
— ChessBase India (@ChessbaseIndia) December 4, 2024
विजेतेपद जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या 7.5 गुणांपेक्षा अजूनही 3.5 गुण दोघांकडेही कमी आहेत. दोन्ही खेळाडूंनी आठव्या गेममध्ये 51 चालीनंतर बरोबरी साधली. 14 फेऱ्यांच्या सामन्यातील हा सहावा ड्रॉ ठरला.
World Chess Championship 2024 : गुकेशने गतविजेत्या लिरेनला पुन्हा रोखले; सातव्या लढतीतही बरोबरी…
चीनच्या 32 वर्षीय लिरेनने सुरुवातीचा गेम जिंकला होता तर 18 वर्षीय गुकेशने तिसऱ्या गेममध्ये विजय मिळवला होता. यापूर्वी दुसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा गेमही अनिर्णित राहिला.