दिनेश खारा होणार स्टेट बॅंकेचे नवे अध्यक्ष
Updated On:

नवी दिल्ली – दिनेश कुमार खारा हे स्टेट बॅंकेचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. सध्याचे स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे दिसून येते. खारा यांच्या नियुक्तीची शिफारस बॅंक बोर्ड ब्युरोने केली आहे.
सध्या दिनेश खारा हे स्टेट बॅंकेत व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करीत असून ते सर्वात ज्येष्ठ संचालक आहेत. 7 ऑक्टोबर रोजी रजनीश कुमार यांची मुदत संपत आहे. सर्वसाधारणपणे स्टेट बॅंकेत कार्यरत असलेल्या व्यवस्थापकीय संचालकांची बॅंकेच्या अध्यक्षपदी निवड केली जाते.





