Dinesh.K.Tripathi : नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी (Dinesh.K.Tripathi) आजपासून ५ एप्रिल या कालावधीत म्यानमारच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते म्यानमार सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर जनरल ये विन ऊ, म्यानमारचे संरक्षण मंत्री जनरल यू ह्तुन आंग, म्यानमार नौदलाचे प्रमुख ॲडमिरल ह्तेन विन यांच्यासह म्यानमार (Dinesh.K.Tripathi) सशस्त्र दलातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. या दौऱ्यात नौदल प्रमुख, म्यानमार नौदलाच्या सेंट्रल नेव्हल कमांड, नेव्हल ट्रेनिंग कमांड आणि क्रमांक 1 फ्लीट येथे भेट देणार आहेत. तसेच म्यानमार सशस्त्र दलांच्या हुतात्मा वीरांच्या युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे. या भेटींमध्ये संरक्षण सहकार्याच्या विविध विषयांवर, विशेषतः सागरी सुरक्षा, क्षमता विकास, कार्यक्षमता वाढ आणि प्रशिक्षण यांवर भर दिला जाईल. Dinesh.K.Tripathi भारतीय नौदल म्यानमार नौदलासोबत संरक्षण सहकार्य बैठक, स्टाफ चर्चा, प्रशिक्षण देवाणघेवाणीशी संबंधित समन्वयातून नियमित संपर्क ठेवते. यामध्ये भारत-म्यानमार नौदल सराव, भारत-म्यानमार समन्वित गस्त, बंदर भेटी आणि हायड्रोग्राफी सर्वेक्षण यांचा समावेश आहे. याशिवाय, दोन्ही नौदल (Dinesh.K.Tripathi) नियमितपणे प्रशिक्षण देवाणघेवाण पुढे नेतात, बहुपक्षीय मंचांमध्ये सहभाग घेतात आणि क्षमता वृद्धीसाठी सहकार्य करतात. भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या, इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम, मिलन, आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू, गोवा मॅरिटाइम कॉन्क्लेव्ह/सिम्पोजियम सागर आणि ॲडमिरल्स कप, या कार्यक्रमांमध्ये म्यानमारने सहभाग घेतला आहे.