Dimbhe Dam – एकेकाळी हरितक्रांतीचा तालुका म्हणून ओळखला जाणारा व आंबेगाव तालुक्याला वरदान असणाऱ्या डिंभे धरणात सध्या ३१ टक्केच असल्यामुळे तालुक्यातील जनतेच्या शेतीच्या नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बर्याचशा ठिकाणी भटकंती करणार्या लोकांचे कळपच्या कळप राहण्यास येत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिकांनाच पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. कधीतरी नळाला पाणी येते. त्यातही हे भटकंती करणारे नागरिक पाण्यासाठी रांगा लावतात. त्याचा त्रास संबंधित नळमालकाला किंवा स्थानिकांना सहन करावा लागतो. गावा-गावात अनेक ठिकाणी कूपनलिका नादुरुस्त आहेत. त्यामुळे पुरेसे पाणी मिळण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. पाणी द्या हो कुणी पाणी, अशी भयानक परिस्थिती एप्रिलच्या मध्यवरच निर्माण झाली आहे. एका गावात नाही म्हटले तरी दोन ते तीन कूपनलिका उपलब्ध आहेत. परंतु त्या नुसत्या नावापुरत्या आहेत. काही ठिकाणच्या कूपनलिका सुरूआहेत, तर काही ठिकाणी ठणठण गोपाळ, अशी स्थितीआहे. धरणक्षेत्रातील अथवा विहिरीतील, तलावातील पाणी दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. याचा परिणाम सामान्यांना जाणवू लागला आहे. डिंभे (ता.आंबेगाव) : डिंभे परिसरातील तलावांचे पाणीसाठे तळाला लागले आहे. पाण्याच्या नियोजनासाठी लोकांनी सहभागातून पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यातूनच काही प्रमाणात पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, याचा गांभीर्याने विचार सरकारने आणि सामान्यांनी करणे गरजेचे आहे. त्यातूनच समस्या सोडविण्यास मदत मिळेल. जिल्ह्यात यंदाच्या वर्षी फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्येच पाणीटंचाई चांगलीच जाणवू लागलीआहे. बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, पुरंदर, जुन्नर खेड, आंबेगाव, भोर, वेल्हे, मुळशी या तालुक्यांच्या काही भागात पाण्याची पायपीट सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळतआहे. या टंचाईवर सामान्य नागरिक आपापल्या परीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे. कुणी पाणी देतं का पाणी? अशी म्हणण्याची वेळ आली आहे. पाणीटंचाईमुळे हाताशी आलेली पिके जळू लागलीआहेत. जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. धरणक्षेत्रात अशी भयानक स्थितीआहे, तर दुष्काळ असणार्या भागामध्ये सध्या नागरिकांची परवड होताना दिसत आहे. या परवडीवर शासनाने लवकरचा तोडगा काढणे गरजचे आहे. जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर तसेच जे भटकंती करणार्या समाजालाही याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. अजून एक महिन्यांनंतर विविध ठिकाणी भयानक चित्र पाहावयास मिळणार आहे, या वर्षी धरण लाभक्षेत्रातदेखील टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. धरणांची पाण्याची पातळी आटू लागली आहे. हाताशी आलेली पिके जळू लागलीआहेत. जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. धरणक्षेत्रात अशी भयानक स्थितीआहे, तर दुष्काळ असणार्या भागामध्ये सध्या नागरिकांची परवड होताना दिसत आहे. या परवडीवर शासनाने लवकरचा तोडगा काढणे गरजचे आहे.