Diljit Dosanjh : पंजाबी गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) त्याच्या कॉन्सर्ट दरम्यान नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याचे लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहते अक्षरशः वेडे झालेले असतात. त्याच्या कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो भर कॉन्सर्ट संतापल्याचे पाहायला मिळाले. नेमका प्रकार काय? (Diljit Dosanjh) एका लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यानकाही लोकांनी दिलजीतच्या विरोधात घोषणाबाजी करत झेंडे दाखवण्यास सुरुवात केली. हे पाहून दिलजीत भडकला आणि माईक हातात घेऊन थेट म्हणाला, “जितके झेंडे दाखवायचे आहेत तितके दाखवा, उचलून बाहेर फेकून देईन. मी ज्या चॅनेलवर जातो तिथे नेहमी पंजाबबद्दल बोलतो. मी कधीच स्वतःच्या गाण्यांचे प्रमोशन केले नाही, तर नेहमी पंजाबसाठीच बोललो आहे.” Diljit Dosanjh Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझ कॉन्सर्टदरम्यान संतापला काही रिपोर्ट्सनुसार दिलजीतने नुकताच अमेरिकेतील प्रसिद्ध ‘द टुनाइट शो विथ जिमी फॉलन’मध्ये सहभाग घेतला होता. मात्र, जेव्हा पंजाबमध्ये पूर आला होता, तेव्हा तो तिथे गेला नाही, असा आरोप करत काही आंदोलकांनी शोमध्ये आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, दिलजीत दोसांझला यापूर्वीही आंदोलनाचा सामना करावा लागला आहे. अनेक प्रसंगी, त्याच्या विधानांमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले आहे. Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझची कारकीर्द संगीत क्षेत्रातील कामाव्यतिरिक्त, दिलजीत दोसांझ अनेकदा चित्रपटांमधील त्याच्या कामामुळेही चर्चेत असतो. दिलजीत दोसांझने पंजाबी आणि बॉलीवूड अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. नुकताच तो बॉर्डर २ या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला होता. Diljit Dosanjh हेही वाचा: Cell Broadcast Alert System : एकाचवेळी सर्वांच्या मोबाईलवर अलर्ट मेसेज अन् उडाला गोंधळ; यामागचं नेमकं कारण समोर