Diljit Dosanjh : …तोपर्यंत मी भारतात कॉन्सर्ट करणार नाही; दिलजीत दोसांझने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : दिलजीत दोसांझ हा प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता आहे. दिलजीत दोसांझचे गाण्याचे कॉन्सर्ट संपूर्ण भारतात होत असतात. त्याचा एक मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच १४ डिसेंबरला भारतात चंदीगढ येथे दिलजीतचा कॉन्सर्ट शो झाला. याचदरम्यान दिलजीतने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Diljit Dosanjh said that instead of troubling them, the Chandigarh Administration should focus on improving its infrastructure. He also added that he will not perform shows in India unless the stage is organized in the center of the venue, allowing him to better connect with the… pic.twitter.com/E0JwIhUc2d
— Gagandeep Singh (@Gagan4344) December 15, 2024
काय घेतला निर्णय?
दिलजीतने चंदीगढ येथील त्याच्या कॉन्सर्ट शो दरम्यान हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर दिलजीतचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिलजीतने सांगितंलय की, जो पर्यंत भारतातील कॉन्सर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत नाही तोपर्यंत मी पुन्हा भारतात कॉन्सर्ट करणार नाही. भारतात लाईव्ह कॉन्सर्ट शोसाठी पायाभूत सुविधा नाहीत. हे कमाईचे मोठे क्षेत्र आहे. त्यातून अनेकांना रोजगारही मिळतो. कृपया यावर तुम्ही लक्ष द्याल.
तसेच पुढच्यावेळी मी स्टेजच्या मध्यभागी उभी राहण्याचा प्रयत्न करेन आणि त्याभोवती तुमची गर्दी असेन. मात्र येथील परिस्थिती सुधारणार नाही तो पर्यंत मी शो करणार नाही. मी विनंती करतो की आम्हाला त्रास देण्याऐवजी पायाभूत सुविधा सुधारा असे दिलजीत दोसांझने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.





