प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – “केंद्र आणि राज्य दोन्हीही सरकारे एकाच विचारधारेची असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी निधी आणण्याचे काम अधिक प्रामाणिकपणे करतील. कार्यकर्त्यांनी नकारात्मक बोलणे बंद करून जनतेचे सेवक म्हणून काम करावे. असे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.स्वतःची उमेदवारी स्वतः जाहीर करू नका, सर्वांनी पक्षशक्ती वाढविण्यासाठी कामाला लागा. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे.” असा त्यांनी निर्धार करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिलीप वळसे पाटील यांनी भाषणातून कान टोचले आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी म्हाडाचे अध्यक्ष, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे आणि उपस्थित . या वेळी मंचावर प्रदीप वळसे पाटील, शिरूर-आंबेगाव विधानसभा अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, राजेंद्र गावडे, प्रकाश पवार, सुभाष उमाप, सविता पऱ्हाड, बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढमढेरे, मनीषा गावडे, विश्वास कोहोकडे, सविता बगाटे, कात्रज दूध संघाच्या माजी अध्यक्षा केशरताई पवार, सुभाष उमाप, आबासाहेब पाचुंदकर शिवाजीराव ढोबळे, सविता प्रमोद पऱ्हाड, शिवाजीराव ढोबळे, स्वप्नील ढमढेरे, मनीषा गावडे, राजेंद्र नरवडे, लहू थोरात, सुजाता नरवडे, निर्मला नवले, अजित कोहोकडे, विश्वास कोहोकडे, नंदकुमार पिंगळे, अमोल जगताप , माणिक खेडकर, सुदाम इचके, वासुदेव जोरी आदी मान्यवर उपस्थित होते.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या. स्थानिक गाव पातळीवरील गट- तट पक्षाला हानी पोहोचवतात, त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. मानसिंग पाचुंदकर म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निष्ठेबद्दल बोलणाऱ्यांची निष्ठा आता कुठे गेली, याचा आत्मचिंतन सर्वांनी करावे. प्रास्ताविक शुभांगी पडवळ यांनी केले. सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले तर दीपक रत्नपारखी यांनी आभार मानले. मानसिंग पाचुंदकर यांचे नेटके नियोजन.. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) तर्फे कवठे येमाई येथे आयोजित भव्य मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माहेश्वरी मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मानसिंग पाचुंदकर यांचे नेटके नियोजन, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मेळाव्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)ने आपले संघटन बळकट करण्याचा संदेश दिला असून, या मेळाव्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे चांगलीच ढवळून निघाल्याचे चित्र दिसून आले.