Dilip Vengsarkar Slams Selectors for Auqib Nabi : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ६ जून ते १० जून दरम्यान मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एकमेव ऐतिहासिक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने नुकतीच भारतीय संघाची घोषणा केली. मात्र, रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या गोलंदाजीने इतिहास रचणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या आकिब नबी या वेगवान गोलंदाजाला निवडकर्त्यांनी डावलले आहे. ज्यामुळे भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू दिलीप वेंगसरकर अत्यंत संतप्त झाले असून त्यांनी निवड समिती आणि बीसीसीआयवर सडकून टीका केली आहे. “बीसीसीआयने रणजी क्रिकेट बंद करून टाकावे!” निवडकर्त्यांच्या या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत दिलीप वेंगसरकर यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “सिलेक्टर्सनी आकिब नबीला दुर्लक्षित करणे हे पूर्णपणे हास्यास्पद आणि समजण्यापलीकडचे आहे. ही कसली निवड आहे? हे अजिबात स्वीकारार्ह नाही. आकिबवर हा सरळ अन्याय आहे. तुम्ही त्या मुलाच्या मनःस्थितीची कल्पना करू शकता का? त्याने संपूर्ण रणजी हंगामात प्रचंड मेहनत घेऊन ६० विकेट्स घेतल्या आणि जम्मू-काश्मीरला पहिल्यांदा रणजीचे विजेतेपद मिळवून दिले. तो या संघात स्थान मिळवण्यासाठी सर्वात पहिला मानकरी होता. जर घरगुती (डोमेस्टिक) क्रिकेटमधील कामगिरी हा निवडीचा निकष नसेल, तर बीसीसीआयने रणजी ट्रॉफी खेळवणेच बंद करून टाकावे.” Dilip Vengsarkar raises questions after Auqib Nabi was overlooked for the Afghanistan Test squad! pic.twitter.com/uJc5VS8lew — CRICKETNMORE (@cricketnmore) May 22, 2026 फॉर्ममध्ये असतानाच संधी द्यायला हवी होती! Former India captain Dilip Vengsarkar has lashed out at the selection committee for ignoring J&K seamer Auqib Nabi for the upcoming Afghanistan Test.#Cricket #AuqibNabi pic.twitter.com/SMw70a2l4u — CREX (@Crex_live) May 22, 2026 आकिब नबीच्या गोलंदाजीचे समर्थन करताना वेंगसरकर पुढे म्हणाले, “तुम्ही एखाद्या गोलंदाजाची निवड त्याची विकेट घेण्याची क्षमता पाहून करता. तो कदाचित १३० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत असेल, पण महत्त्वाचे म्हणजे त्याच्याकडे विकेट घेण्याचे कसब आहे. या मुलाने सातत्याने विकेट्स घेण्याची क्षमता सिद्ध केली आहे. त्याला भारतीय संघात आणून ग्रूम करण्याची हीच योग्य वेळ होती. जेव्हा एखादा खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये असतो, तेव्हाच त्याला संधी दिली पाहिजे. तुम्ही त्याचा आत्मविश्वास कमी होण्याची, फिटनेस खराब होण्याची किंवा त्याची खेळातील भूक संपण्याची वाट पाहता का?” हेही वाचा – Vijay Shankar Retirement : क्रिकेट जगतातून मोठी बातमी! टीम इंडियाच्या ‘3D’ खेळाडूने अचानक घेतली सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती रणजी २०२५-२६ च्या हंगामात जम्मू-काश्मीरला विजेतेपद मिळवून देण्यात आकिब नबीचा सिंहाचा वाटा होता. मात्र, एवढ्या मोठ्या यशानंतरही त्याला भारतीय संघात स्थान न मिळाल्याने आता भारतीय क्रिकेट वर्तुळात सिलेक्टर्सच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.