Digvijaya Singh clarification। काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींचा जुना फोटो शेअर करून संघाच्या संघटनात्मक ताकदीचे कौतुक केल्याने पक्षात खळबळ उडाली. त्यानंतर त्य्नाच्यावर सर्वत्र टीका झाली. त्यानंतर आता त्यांच्या विधानाचे समर्थन करताना,” गोडसेसारख्या मारेकऱ्यांकडून आपल्याला काहीही शिकण्याची गरज नाही” असे ते म्हणाले. पुढे बोलताना, “मी नेहमीच भाजप-आरएसएसच्या विचारसरणीला विरोध केला आहे आणि त्यांच्याविरुद्ध लढत राहीन. प्रत्येक संघटनेला बळकटी देण्याची गरज आहे असे माझे मत आहे.” यावर शशी थरूर यांनीही प्रतिक्रिया दिली. थरूर म्हणाले की, “त्यांच्या विधानाकडे त्याच्या संपूर्ण संदर्भात पाहिले पाहिजे. प्रत्येकाने शिस्त राखली पाहिजे. संघटन मजबूत करण्याबद्दल दिग्विजय सिंह यांचे बोलणे बरोबर आहे. ते स्वतःच उत्तर देतील. मलाही आमची संघटना मजबूत हवी आहे. आमच्या संघटनेत शिस्त असावी.” असेही त्यांनी म्हटले आहे. Digvijaya Singh clarification। यापूर्वी, दिग्विजय यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचा जुना फोटो पोस्ट केला होता. त्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी बसलेले दिसत होते. सिंह यांनी हे आरएसएस आणि भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे उदाहरण म्हणून उद्धृत केले. दिग्विजय सिंह यांनी एका पोस्टमध्ये, “काँग्रेस पक्षात सुधारणा आणि सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची गरज यावर भर दिला आहे, ज्यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना टॅग केले आहे. सिंह यांनी यापूर्वी पक्ष संघटना मजबूत करण्याचे समर्थन केले आहे. पक्षाने मत चोरीविरुद्ध मोहीम जाहीर केल्यानंतरही, दिग्विजय सिंह यांनी वॉर्ड पातळीवर संघटनेच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाद निर्माण झाल्यावर त्यांनी म्हटले की, “मी संघाचे किंवा मोदींचे कौतुक केलेले नाही. मी संघटनेबद्दल बोललो आहे. मी संघाचा आणि मोदींचा कट्टर विरोधक आहे.” Digvijaya Singh clarification।