Digvesh Singh Rathi vs Abhishek Sharma : अभिषेकशी पंगा दिग्वेश राठीला नडला ! BCCI ने केली ‘ही’ मोठी कारवाई

मुंबई : आयपीएल 2025 सध्या अंतिम टप्य्यात आली आहे. आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये नियमांचे उल्लंघन करणं काही खेळाडूंना चांगलंच महागात पडलं आहे. सोमवारी अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेश सिंग राठी आणि सनरायजर्स हैदराबादचा स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक (Digvesh Singh Rathi vs Abhishek Sharma) शर्मावर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.
दिग्वेश राठीचे निलंबन
दिग्वेश राठीचे (Digvesh Singh Rathi vs Abhishek Sharma) यंदाच्या हंगामातील हे तिसरं Level 1 चे उल्लंघन होतं. यापूर्वी त्याला पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात (1 एप्रिल 2025) एक आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात (4 एप्रिल 2025) दोन डिमेरिट गुण मिळाले होते. आता त्याचे एकूण डिमेरिट गुण पाच झाले आहेत. आयपीएल नियमांनुसार, पाच डिमेरिट गुण झाल्यास खेळाडूला एका सामन्यासाठी निलंबित केले जाते. त्यामुळे दिग्वेश सिंगला आता 22 मे 2025 रोजी अहमदाबाद येथे गुजरात टायटन्सविरुद्ध होणाऱ्या एलएसजीच्या पुढील सामन्यात खेळता येणार नाही. Level 1 च्या उल्लंघनासाठी सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.
अभिषेकला ठोठवला दंड
तर दुसरीकडे याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मा (Digvesh Singh Rathi vs Abhishek Sharma) यालाही आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामातील हे त्याचे पहिले Level 1 चे उल्लंघन होते आणि त्यामुळे त्याला एक डिमेरिट गुण मिळाला आहे. Level 1 च्या उल्लंघनासाठी सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.
नेमके काय घडले ?
दिग्वेश राठीने अभिषेकला बाद केल्यानंतर त्याच्या ट्रेडमार्क ‘नोटबुक सेलिब्रेशन’ने आनंद व्यक्त केला. राठीचे हे सेलिब्रेशन अभिषेकला आवडले नाही आणि त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मैदानातील पंचांनी आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
एलएसजीचे आव्हान संपुष्टात
सोमवारी अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ येथे सनरायझर्स हैदराबाद (LSG vs SRH) विरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव झाल्याने त्यांचे या सिझनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यातच आता दिग्वेश सिंग राठीचे निलंबन झाल्याने एलएसजी दुसरा फटका बसला आहे.





