लासुर्णे – लासुर्णे (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीने गेल्या दोन महिन्यांपूर्वी पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीसाठी लासुर्णे – बोरी मुख्य रस्त्यावर खोदलेला खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
या मार्गावर गेल्या महिन्यापूर्वी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता. याच रस्त्यालगत असलेल्या दारू दुकानामुळे त्या भागात वर्दळ आहे. हा खड्डा त्वरित बुजवावा, अशी मागणी लासुर्णे व बोरी परिसरातील नागरिकांनी केली.