नगर: जामखेड तालुक्यात स्कॉर्पिओ कारमधुन आलेल्या चौघांनी पेट्रोलपंपावर 3 हजार 100 रुपयांचे डिझेल टाकुन पेट्रोलपंप कर्मचाऱ्यास गावठी कट्ट्याचा धाक दाखविला व डिझेलचे पैसे न देताच निघुन गेले. ही घटना बुधवारी (दि.5) दुपारी जामखेड करमाळा रोडवरील नान्नज शिवारातील नंदादेवी पेट्रोपंपावर घडली. याबाबत माहिती अशी की, नंदादेवी पेट्रोलपंपावर नंदु प्रकाश गोरे (रा. आपटी, ता.जामखेड), नवनाथ वाल्मिक बोराटे (रा.जवळके), सचिन दिगंबर चव्हाण (रा.जामखेड) व अन्य एक अनोळखी इसम असे चौघेजण स्कॉर्पिओ गाडी (क्र.एमएच 16 एटी 9589) मध्ये आले.पंपावरील कामगार शुभम सुरेश कोळपकर याच्याकडून 3 हजार 100 रुपयांचे डिझेल टाकुन घेतले. व पिस्टलचा धाक दाखवुन आम्ही पैसे देणार नाही. तुला काय करायचे तु करुन घे असा धाक दाखवुन निघुन गेले.