समृद्धी महामार्गावर डिझेल चोरणारी टोळी सक्रिय; दोघे गजाआड

वाशिम – समृद्धी महामार्गावर उभ्या वाहनातून डिझेल चोरी होण्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. शुक्रवारी सकाळी समृद्धी महामार्गावर कारंजा जवळ पुन्हा डिझेल चोरणाऱ्या दोन आरोपींना गाडीसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या ट्रक आणि कंटेनरसारख्या गाड्यांच्या डिझेल टॅंकमधून पाईप आणि मोटरच्या सहाय्याने डिझेल चोरीचा प्रकार घडल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
काही दिवसांपूर्वी असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री (28 जुलै) रोजी सकाळी वाशिमच्या वनोजा जवळ पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना एका गाडीतून डिझेल चोरीला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी या चोरांचा पाठलाग सुरु केला. या टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच वाशिमध्ये पुन्हा एकदा ही घटना घडली आहे.
अनेकदा या महामार्गावर चोरीच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यातच आता डिझेल चोरीच्या घटनांनी नागरिक पुन्हा एकदा त्रस्त झाले आहेत. दरम्यान या टोळीतील एकाला बेड्या घालण्यात वाशिम पोलिसांना यश आले आहे. पण त्यातील इतर आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहे. अनिल पवार, गजानन पवार, योगेश दाजी ह्या तीन आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहे. सध्या इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.





