मुंबई – बिग बॉस म्हणजे कॉन्ट्रोव्हर्सी क्रिएट करणाऱ्यांची जत्रा.. इथे साळसूद किंवा नॉन ग्लॅमरस माणसांना अजिबात एन्ट्री मिळत नाही… इथे तुम्ही जितके डँबिस… तितके हिट… असंही समीकरण आहे. आणि या समीकरणाला साजेसा असा एक माणूस नुकतचा हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केला आहे.
हा कुणी साधा-सुद्धा माणूस नसून ही एक अष्टपैलू व्यक्ती आहे. असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे ‘अभिजित बिचुकले’ यांनी आता सलमान खानच्या हिंदी ‘बिग बॉस 15’ मध्ये एन्ट्री केली आहे.
घरामध्ये अभिजित आणि देवोलीना भट्टाचार्जी नेहेमीच एकत्र दिसून येतात. मात्र, गेल्या आठवड्यात अभिजीतने देवोलिनाकडे एक भलतीच मागणी केली होती. त्यामुळे ती बिचुकलेवर चांगलीच भडकली. अभिजित बिचुकले यांनी देवोलीनाकडे किसची मागणी केली असून, त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
दरम्यान, बिचुकलेच्या अश्या वागण्यामुळे घरातील सर्व वातावरण दूषित झाले असून, बऱ्याच चर्चा आणि वाद रंगू लागले आहेत. त्यानंतर आता बिग बॉसच्या घरात अभिजितनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.
अभिजित बिचुकलेनं अभिनेत्री देवोलीनाकडे किसची मागणी केल्यानंतर घरातील सर्वच सदस्यांनी त्याच्या या वागण्यावर आक्षेप घेत त्याच्याशी बोलणं बंद केलं. त्यामुळे आता अभिजित बिचुकलेला घरात एकटं राहावं लागत आहे. त्यामुळेच का होईना बिचुकलेनं असं पॉल उलचण्याचं धाडस केलं असावं.
View this post on Instagram
अभिजित बिचुकले निशांतकडे जाऊन त्याला विचारतो की, ‘वॉशरुममध्ये कोणता हेअर कलर आहे का? मला खायचा आहे… मागच्या काही दिवसांपासून घरात जे चाललं आहे त्यामुळे मी वैतागलो आहे.’ ही गोष्ट निशांत, शमिता आणि रश्मी यांना सांगतो आणि त्यानंतर प्रतीक अभिजितला समजावण्याचा प्रयत्न करतो.
काय झालं होत अभिजित आणि देवोलीना मध्ये…
मागील आठवड्यात ‘बिग बॉस’च्या एका फॅनपेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ एका टास्क दरम्यानचा होता. यात स्पर्कांना सामानाची चोरी करायची असते. व्हिडीओच्या सुरुवातीला अभिजीत आधी देवोलीनाचे गाल ओढतो आणि बोलतो, “माझ्याकडे खूप सामान आहे. मी तुझ्यासाठी काहीही करेन, पण मला एक किस पाहिजे. आणि याच कारणावरून हा सर्व वाद रंगू लागला.