मुंबई – मराठी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ‘नेहा पेंडसे’ सध्या लाखो दिलों की धडक बनली आहे. नेहाने आपल्या दमदार अभिनय आणि ग्लॅमरस लूकमुळे सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.सध्या नेहा एका व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
नेहाने नुकताच एका पार्टीतील तिचा एक व्हिडीओ सोशल मिडीआयवर शेअर केला आहे. ज्यावर अनेकांनी तिच्या या अतरंगीपनाचे कौतुक केले आहे. तर काही नेटकऱ्यांना तिची ही कृती फारशी रचलेली दिसत नाही. व्हिडिओमध्ये नेहा एका पार्टीमध्ये असल्याचे दिसून येते. यावेळी ती काही प्लेट्स हातात घेऊन त्या फोडताना दिसते. प्लेट फोडताना ती या गोंष्टींचा पूर्ण आनंद घेत असल्याचे दिसून येते.
नेहाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी देखील आपले मत व्यक्त करायला सुरुवात केली आहे. एका नेटकाऱ्याने मॅडम दारू जास्त पिली का ? असा सवाल विचारला आहे. तर दुसऱ्या एकाने जास्त नशा झाला का असं म्हंटल आहे. अनेकांनी तर नेहाला पैसे वाया न घालवता दान करण्याचा सल्ला देखील यानिमित्त दिला आहे.
View this post on Instagram
नेहा पेंडसे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे तिचे फॅन फॉलोविंग देखील मोठे आहे. मराठी व्यतिरिक्त इतर भाषणमध्ये देखील नेहा काम करत असते. कधी ती आऊटफिट्समुले चर्चेत असते तर कधी आपल्या आगामी प्रोजेक्ट्समुळे. सध्या नेहाने पोस्ट केलेला हा व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल होतोय.