नवी दिल्ली – कोरोना विषाणू संसर्गामुळे देशावर ओढवलेल्या आर्थिक संकटातून देशवासियांना बाहेर काढण्यासाठी काळ मोदी सरकारतर्फे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांशी संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, ‘ज्यावेळी संपूर्ण जग करोनाग्रस्त अंधारात चाचपडत होतं तेव्हा भारताने तयार केलेलं एक औषध आशेचा किरण म्हणून समोर आलं.’ त्यांच्या या विधानावरून बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक व संगीतकार विशाल दादलानी याने मोदींवर टीका केली आहे.
Whut? Which medicines? Who is praising them, and why?
Did we find a cure for Covid-19, that I’ve missed hearing about? https://t.co/sb4LMcrTez
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) May 12, 2020
विशाल दादलानी यांनी ट्विट केले आहे की,’काय? कुठलं औषध? कोण या औषधाचा प्रचार करत आहे आणि का? आपण करोनावर औषध शोधलं का? मी काहीतरी चुकीचं तर ऐकलं नाही ना?” अशा आशयाचं ट्विट करत विशालने खोचक टीका केली आहे ,