Trisha Krishnan Post : मोठा पडदा गाजवल्यानंतर आता थलपती विजय तामिळनाडूच्या राजकारणात किंगमेकर नाही तर किंग ठरला आहे. नुकत्यात झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्याच्या टीव्हीके पक्षाने प्रस्थापित पक्षाला आस्मान दाखवलं. तब्बल १०६ जागा टीव्हीकेच्या तामिळनाडू विधानसभेत निवडून आल्या आहेत. तामिळनाडूच्या जनतेने खास करून तरुणांनी विजयवर मोठा विश्वास दाखवत सत्तेची चावी त्याच्या हाती सुपूर्त केली आहे. मात्र, टीव्हीकेला सत्तास्थापन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बहुमतासाठी ११८ आमदारांचा पाठिंबा असणे अनिवार्य आहे. विजय यांच्या पक्षाकडे सध्या ११६ आमदारांचा पाठिंबा आहे. दोन आमदारांची साथ विजयला मिळाल्यानंतर बहुमत शक्य आहे. त्यासाठी हालचालींना वेग आला आहे. तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय शपथ घेतील, अशी चर्चा आहे. या दरम्यान अभिनेत्री आणि विजयची कथित गर्लफेंड त्रिशा कृष्णन हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्रिशाने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट एक क्रिप्टिक पोस्ट आहे. ज्याचा संबंध त्यांच्या रिलेशनशी जोडला जातो आहे. त्रिशाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. Thalapathy Vijay | Trisha Krishnan या फोटोच्या तळाशी तिने काही लोक एकमेकांशी बोलताना दाखवले आहेत आणि कोट बॉक्समध्ये ‘ब्ला ब्ला’, ‘यड्डा या’ आणि ‘डाह डाह’ असे शब्द लिहिले आहेत. जे गॉसिप करणाऱ्यांचा संदर्भ असावा, असे असल्याचे सांगितले जात आहे. तसंच फोटोच्या मधोमध अगदी ठळक अक्षरात तिने IYKYK असं लिहिलं आहे. ज्याचा फुल फॉर्म if you know, you know असा आहे. याचा अर्थ जर तुम्हाला माहित असेल, तर तुम्हाला माहित आहे. या क्रिप्टिक पोस्टवरुन नेटकऱ्यांनी त्रिशाची ही पोस्ट म्हणजे विजयसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चांवर तिचं उत्तर असल्याचं म्हटलं जातं आहे. त्रिशा आणि विजय यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. विजयसोबत त्रिशा कृष्णनचं नाव जोडलं जात आहे. राखी सावंत म्हणाली… (Trisha Krishnan Post) त्या दरम्यान त्रिशाची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. या सगळ्यात एका पॉडकास्टमध्ये राखी सावंतने विजय आणि त्रिशाच्या नात्याबद्दल कमेंट केली. ‘मला वाटतं त्यांनी लग्न करावं. विजय आणि त्रिशाने लग्न करावं. मी मेहंदीसाठी जाईन’ असे ती म्हणाली होती. हेही वाचा : Mother’s Day Special Cake Recipe: मदर्स डे करा खास! आईसाठी घरच्या घरी बनवा हे ५ स्वादिष्ट केक