पंढरपूर- शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी १० रुपयात जेवण आणि १ रुपयात आरोग्य तपासणी करून अशी घोषणा केली होती. तसेच, शिवसेनेच्या जाहीरनाम्यात देखील या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘१० रुपयात जेवण आणि १ रुपयात आरोग्य तपासणी यांच्या कोणी दिली होती का? हे करायला गेली पाच वर्षे यांना कोणी थांबवलं होतं का?’ अशी टीका अजित पवार यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भारत भालके यांच्यासाठी आज मंगळवेढ्यात प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अजित पवार बोलत होते.