इंदापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हरिनामात दंग

Updated On:

इंदापूर (प्रतिनिधी) – निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे कांदा मुळा भाजी ‘अवघी विठाई माझी’ या संत सावता महाराज यांच्या अभंग वर देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टाळ वाजवत हरीच्या दासात तल्लीन होत हरिनामाचा जागर केला.

सीतारामन यांनी संध्याकाळी साडेसात वाजता निमगाव केतकी येथील श्री संत सावता महाराज मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रकाचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर चैतन्य महाराज बारवकर व निमगाव केतकी व दहीगाव येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.

या वेळी संत सावता महाराज यांचा “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ हा अभंग घेण्यात आला. या वेळी सीतारामन यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे यांनीही टाळ वाजवून या अभंगाला प्रतिसाद दिला.

या वेळी सितारामन यांचा सत्कार इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष देवराज जाधव, केतकेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष गोरख आदलिंग, शालन भोंग, राजू जठार, गणेश घाडगे, पांडुरंग हेगडे, संतोष पवार, सिकंदर मुलाणी, अर्जुन भोंग यांसह कार्यकर्त्यांनी केला. संत सावतामाळी ट्रस्ट व केतकेश्वर पतसंस्था यांच्या वतीने सितारामन यांना विठ्ठल मूर्ती भेट देण्यात आली.

आणखी संबंधित बातम्या

Indapur : क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ देणार

2026-10-07 08:01:58

Indapur : क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ देणार

Indapur : दुष्काळ जाहीर; पण पंचनाम्यांना ‘दुष्काळ’

2026-10-07 07:55:59

Indapur : दुष्काळ जाहीर; पण पंचनाम्यांना ‘दुष्काळ’

Pune District : इंदापूरच्या शेतकर्‍यांसाठी 5 कोटींच्या अतिरिक्त निधीचा मार्ग मोकळा?

2026-09-27 07:50:21

Pune District : इंदापूरच्या शेतकर्‍यांसाठी 5 कोटींच्या अतिरिक्त निधीचा मार्ग मोकळा?

Indapur : संकटाच्या काळात राजकारण नको

2026-09-25 08:05:01

Indapur : संकटाच्या काळात राजकारण नको

Indapur : नीरा-भीमाच्या शिरपेचात राष्ट्रीय मानाचा तुरा

2026-09-23 08:50:04

Indapur : नीरा-भीमाच्या शिरपेचात राष्ट्रीय मानाचा तुरा