प्रभात वृत्तसेवा पिंपरी – निवडणुकीपूर्वी शहरात पक्षांतराचे वारे नव्हे तर वादळ वाहत होते. शेकडोंच्या संख्येने विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकत्र्यांनी पक्षांतर केले. त्यापैकी काहींना पक्षांनी उमेदवारीही दिली. परंतु यंदा मतदार राजाचा मूड जरा वेगळाच होता. जनेतेने राजकीय वर्तुळाला धक्के देणारे जनादेश दिले. भाजपला बहुमत मिळाले असले तरी शहरात वेगवेगळ्या भागांत पक्षांची ओळख असलेल्या नेत्यांना देखील जनतेने पराभूत केल. अशीच स्िथती पक्षांतर करणाऱ्यांच्या बाबतीतही होती. पक्षांतर करुन निवडणूक लढविणाऱ्या २८ जणांचा निर्णय योग्य ठरला आणि ते विजयी झाले तर ११ जणांना पराभवाचा सामना करावा लागला.राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार पक्षातून भाजपमध्ये गेलेले जालिंदर शिंदे, कुशाग्र कदम, प्रविण भालेकर, शऱद मिसाळ, आशा सुर्यवंशी, अपर्णा डाेके, विनाेद नढे, राहूल कलाटे, शकुंतला धराडे, शाम जगताप, नवनाथ जगताप, प्रशांत शिताेळे, शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले रवी लांडगे, तुषार सहाने, रिटा सानप, शिवानी नरळे, अमित गावडे, संजय काटे, भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या भिमाबाई फुगे, अरूणा लंगाेटे, शेखर चिंचवडे, सविता आसवाणी, संदिप वाघेरे, दिप्ती कांबळे, शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले प्रमाेक कुटे, अनंत काे-हाळे, जितेंद्र ननावरे, राष्ट्रवादी काॅंग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या रेश्मा कातळे हे उमेवार विजयी ठरले आहेत. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या साधना काशीद, रूपाली आल्हाट, रेखा दर्शिले, भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या अश्विनी जाधव, सीमा सावळे, धनंजय काळभाेर, अश्विनी चिंचवडे, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या अनुराधा गाेफणे, प्रसाद शेट्टी, उषा वाघेरे, शिवसेनेतून भाजपमध्ये मिनल यादव यांना पराभवाला सामाेरे जावे लागले. सात शहराध्यक्ष होते रिंगणात महापालिका निवडणुकीत तब्ब्ल सात पक्षाचं शहराध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी चार जणांचा विजय झाला तर तीन जण पराभूत झाले. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष याेगेश बहल, भाजपचे शत्रुघ्न काटे, रिपाईचे कुणाल वाव्हळकर, शिवसेनेचे निलेश तरस या चार शहराध्यक्षांचा विजय झाला आहे. तर मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाचे तुषार कामठे, आपचे रविराज काळे यांचा पराभव झाला. 27 माजींचा पराभव शहरातील २७ माजी नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरुनही माजीच राहिले आहेत. जनतेने तब्बल २७ माजी नगरसेवकांना जनादेश दिला नाही. त्यामध्ये अश्विनी जाधव, वसंत बाेराटे, अनुराधा गाेफणे, प्रियांका बारसे, संताेष लाेंढे, सीमा सावळे, विलास मडिगेरी, सचिन चिखले, मीनल यादव, माेरेश्वर भाेंडवे, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, माेरेश्वर शेडगे, जयश्री गावडे, सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, उषा वाघेरे, उषा काळे, मयुर कलाटे, रेखा दर्शिले, तुषार कामठे, चंद्रकांत नखाते, शितल काटे, उषा मुंढे, राेहित काटे, उषा ढाेरे या 27 माजी नगरसेवकांना पराभवाची चव चाखण्याची वेळ आली.