मोदी अच्छे दिन विसरले का ? – कपिल सिब्बल

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टीकेला वेग आला असून, राजकारण वेगळ्याच स्तरावर पोचल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत मोदी अच्छे दिन विसरले असल्याचे म्हंटले आहे.

काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी आज आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत, मोदी देशाला फसवत आहेत, अशी टीका केली आहे. ट्विट मध्ये लिहीत कपिल सिब्बल यांनी, मोदी म्हणतात “माझ्यासाठी देशाला प्राधान्य आणि नंतर निवडणूक” म्हणूनच मोदी रोजगार, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छ हवा, आरोग्य सेवा, शिक्षण ,महिलांची सुरक्षा, हिंसा निर्मूलन अशा विषयांबद्दल बोलत नसल्याचे म्हंटले आहे. तसेच पुढे मोदी अच्छे दिन विसरले ? असा उपरोधिक प्रश्न देखील सिब्बल यांनी विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाच्या विविध भागातील भाजप कार्यकर्त्यांशी व नागरीकांशी मै भी चौकीदार अभियाना अंतर्गत नमो ऍपवरून संवाद साधला होता. यावेळी माझ्यासाठी देश सर्वतोपरी असून निवडणुका नंतर असल्याचे त्यांनी म्हंटले होते. त्यानंतर आज कपिल सिब्बल यांनी मोदींच्या याच वाक्याचा समाचार घेत मोदींना आता अच्छे दिन विसर पडल्याचे म्हंटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here