स्तनाच्या कर्करोगाचे निदान मॅमोग्राफीद्वारे कसे केले जाते? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणतात…

Updated On:
स्तनाच्या कर्करोगाचे निदान मॅमोग्राफीद्वारे कसे केले जाते? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणतात…

स्तनाच्या कर्करोगाचे निदान मॅमोग्राफीद्वारे कसे केले जाते?, मॅमोग्रॅम : कोणी कधी आणि का करावा? , स्तनात गाठ असल्यास मॅमोग्रॅम करावा का सोनोग्राफी करावी?…यासारख्या अनेक महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा विख्यात ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ प्रांजली गाडगीळ यांच्यासह दैनिक प्रभातने साधलेल्या विशेष संवाद मालिकेचा सहावा भाग…

मॅमोग्रॅम : कोणी कधी आणि का करावा?

प्रश्न क्र.(1) मॅमोग्रॅम म्हणजे काय?

उत्तर – मॅमोग्राम हा स्तनाचा काढलेला विशेष प्रकारचा XRay आसतो. ही तपासणी मॅमोग्राफी सेंटर मध्ये खास उपकरणे वापरून केली जाते. अगदी सूक्ष्म, कमी प्रमाणात रेडिएशन वापरून प्रत्येक स्तनाचे दोन Xray काढण्यात येतात . रेडिओलॉजिस्ट या चित्रांचा अभ्यास करुन रिपोर्ट तयार करतात.

प्रश्न क्र. (2) स्तनाची काही तक्रार नसेल तर मॅमोग्राफी का करावी?

उत्तर – स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये सर्वात अधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग असल्याने, ४० वर्षांपुढील प्रत्येक स्त्रीने वार्षिक ही तपासणी करावी असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. नियमित तपासणी करणाऱ्या महिलांमध्ये स्तनकर्करोगाचे निदान, गाठ हाताला लागण्या अगोदर होऊ शकते. प्राथमिक अवस्थेत उपचार झाल्यास उपचार सोईस्कर होतात आणि जिवाला धोका टळतो. सशक्त स्त्रियांमध्ये या हेतू ने केलेल्या तपासणी ला ” स्क्रिनिंग मॅमोग्राफी ” म्हंटले जाते.

प्रश्न क्र. (3)  स्तनात गाठ असल्यास मॅमोग्रॅम करावा का सोनोग्राफी करावी?

उत्तर –  ४० वर्षाखालील वयाच्या स्त्रियांसाठी अगोदर स्तनाची सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासाऊंड तपासणी केली जाते. सोनोग्राफी मध्ये Xray ना वापरता, ध्वनी लाहिरींचं वापर होतो. वय वर्ष ४० पेक्षा अधिक असल्यास, आधी मॅमोग्राफी आणि त्यानंतर आवश्यक असल्यास सोनोग्राफी केली जाते. दोन्ही तपासण्या एकमेकांना सहाय्यक असून, अनेक वेळा पूर्ण निदान करण्यासाठी दोन्ही साधनांचा वापर केला जातो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच या तपासण्या कराव्या.

प्रश्न क्र. (4) मॅमोग्रॅम साठी जाताना काय तय्यारी करावी?

उत्तर – सकाळी अंघोळ केल्यावर डिओडरंट पावडर किंवा क्रीम इत्यादी ना लावता तपासणी साठी जावे. या तपासणी साठी उपाशी राहण्याची गरज नाही. आतापर्यंत केलेल्या सर्व मॅमोग्राफी व सोनोग्राफीचे रिपोर्ट बरोबर ठेवा. नवीन तपासणीची तुलना, आधीच्या फिल्म्स शी करणे महत्वाचे असते. आधीचे बायोप्सी अथवा सर्जरी चे रिपोर्ट देखील बरोबर ठेवावे. या साठी कॉन्ट्रास्ट किंवा I.V. ची गरज नसते.

प्रश्न क्र. (5)  मॅमोग्राम ऍबनॉर्मल आला तर काय करावे लागते ?

उत्तर – मॅमोग्राम मधे काही अनियमितता आढळली तर त्याचे योग्य निदान करण्यासाठी अधिक तपानसण्या केल्या जातात. अनेक वेळा सोनोग्राफीने शंकानिरसन होते, तर कधी टोमॉसिन्थेसिस, किंवा ब्रेस्ट MRI या विशेष imaging साधनांचा वापर केला जातो. कर्करोगाची किंवा त्याच्या प्राथमिक अवस्थेची थोडी जरी शक्यता असेल, तर सुई ची तपासणी म्हणजे बायोप्सी केली जाते. गाठ हाताला लागत नसेल तर बायोप्सी साठी Stereotaxy किंवा सोनोग्राफी चा वापर केला जातो.

प्रश्न क्र. (6) ज्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होऊन त्याचा उपचार झाला असेल, त्यांनी पण मॅमोग्रफी करावी का ?

उत्तर – मॅस्टेकटॉमी ची शस्त्रक्रिया करून स्तनाचा पूर्ण भाग काढला असेल, तरी दुसऱ्या बाजूची वार्षिक तपासणी केली पाहिजे. स्तनाचा काही भाग राखून लंपेकटोमी केली असेल तर १-२ वर्ष दर सहा महिन्याने मॅमोग्रफी केली जाते आणि त्यानंतर वार्षिक तपासणी केली जाते. कॅन्सर रुग्णांनी ऑन्कॉलॉजिस्ट च्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रश्न क्र. (7) हाताला गाठ लागत असेल आणि मॅमोग्राफी मध्ये दिसली नाही तर काय करावे ?

उत्तर –  स्तनाची काही जरी तक्रार असेल तर मॅमोग्राफी करण्या आधी डॉक्टरांकाढून तपासणी करून घ्यावी. गाठ मॅमोग्रॅम मध्ये न दिसण्याची अनेक करणे असू शकतात. तपासणी करताना नीट पोसिशन दिली गेली नाही, तर स्तनाचा पूर्ण भाग चित्रामध्ये येत नाही आणि रिपोर्टींग मध्ये चूक होऊ शकते. काही महिलांमध्ये स्तनाची ठेवण घनिष्ठ असेल (डेन्स ब्रेस्ट असतील ) तर Xray ची तपासणी पुरेशी होत नाही आणि सोनोग्राफी किंवा इतर साधनांची मदत घेतली जाते. तपासण्या केल्यावर समाधान झाले नाही तर स्तनरोग चिकित्सक किंवा ब्रेस्ट सर्जन चा सल्ला घ्यावा.

प्रश्न क्र. (8) मॅमोग्रॅम मध्ये calcification दिसलं तर ते शरीरात calcium जास्त असल्याने होतं का ?

उत्तर –  नाही ,मॅमोग्राम मध्ये दिसणाऱ्या calcification चा शरीरातल्या calcium च्या पातळी शी संबंध नसतो. या calcification चे pattern distribution shape आकार या वरून त्याचं काय कारण आहे असा अनुमान बांधला जातो. काही विशेष प्रकारचे calcification हे कॅन्सर ची शक्यता दर्शवतात – म्हणून ही तपासणी अनुभवी ब्रेस्ट रेडिओलॉजिस्ट किंवा ब्रेस्ट सर्जन नी पारखून पाहणं आवश्यक आहे. अशा calcifications साठी stereotactic vaccum assisted biopsy करावी लागते.

आणखी संबंधित बातम्या

Food Safety : फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय? सवय पडू शकते महागात, वाचा मोठे धोके !

2026-07-05 22:27:19

Food Safety : फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय? सवय पडू शकते महागात, वाचा मोठे धोके !

सामाजिक : आरोग्यावर मूक हल्ला

2026-07-03 05:00:21

सामाजिक : आरोग्यावर मूक हल्ला

Prakash Abitkar : सर्पदंशाच्या जनजागृतीसाठी प्रभावी उपाययोजना करणार; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

2026-07-01 19:42:16

Prakash Abitkar : सर्पदंशाच्या जनजागृतीसाठी प्रभावी उपाययोजना करणार; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

Health Tips: जेवणानंतर लगेच चहा पिता? ही सवय आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; तज्ज्ञांनी सांगितले कारण

2026-06-27 09:58:08

Health Tips: जेवणानंतर लगेच चहा पिता? ही सवय आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; तज्ज्ञांनी सांगितले कारण

Tukaram Mundhe : "सार्वजनिक आरोग्याशी तडजोड केल्यास कठोर कारवाई होणार"; तुकाराम मुंढे यांचा थेट इशारा

2026-06-26 18:28:04

Tukaram Mundhe : "सार्वजनिक आरोग्याशी तडजोड केल्यास कठोर कारवाई होणार"; तुकाराम मुंढे यांचा थेट इशारा