The Raja Saheb Box Collection : पूर्वी अॅक्शन आणि रोमान्समध्ये रमलेला प्रभास यावेळी प्रेक्षकांसाठी काहीतरी हटके घेऊन आला आहे. ९ जानेवारीला प्रभासचा ‘द राजा साब‘ हा बहुचर्चित हॉरर कॉमेडी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने इतिहास रचत सर्वाधिक चर्चेत असलेल्या धुरंधर चित्रपटाच्या ओपनिंग डे कलेक्शनला मागे टाकले आहे. प्रभासच्या ‘द राजा साब’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ५४.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर पेड प्रिव्ह्यूमध्ये ९.१५ कोटी रुपये कमावले आहेत आणि यासह पहिल्या दिवशीचे चित्रपटाचे एकूण कलेक्शन ६३.३ कोटी रुपये झाले आहे. परदेशातही चित्रपटाने २६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. धुरंधरने पहिल्या दिवशी भारतात २८ कोटी रुपये आणि जगभरात ३२ कोटी रुपये कमावले होते. हा रेकॅार्ड प्रभासच्या द राजा साहब चित्रपटाने मोडला आहे. प्रभासचे मागील चित्रपट पाहता त्याच्या चित्रपटांना हवे तसे अपेक्षित यश मिळत नव्हते. ती कमरता आता द राजा साहब चित्रपटाने भरून काढली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मारूती यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभाससोबत संजय दत्त, निधी अग्रवाल, बोमन इराणी आणि मालविका मोहनन मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाला चांगले यश मिळत असले तरी हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांकडून चित्रपटाला ट्रोलही केले जात आहे, असे असले तरी प्रभासच्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी मिळालेले यश प्रभासचे कमबॅक करण्यासाठी पुरेसे आहे. हेही वाचा : “भाजपची विचारधारा मुस्लिमांविरोधात नाही, तर…; नितीन गडकरींचे विधान