‘धुरंधर’च्या अभिनेत्रीकडून दिग्दर्शकाचं तोंडभरून कौतुक; आदित्य धरनही दिला खास रिप्लाय, सारा अर्जुनची पोस्ट चर्चेत!

Sarah Arjuna : ‘धुरंधर‘ चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा झाला आहे. मात्र, अजूनही चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. प्रेक्षक चित्रपटाचे भरभरून कौतुक करीत असून, बॅाक्स अॅाफिसवर चांगली कमाई चित्रपट करत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. पोस्ट लिहून कलाकार मंडळी देखील चित्रपटाविषयी भरभरून बोलताना दिसत आहेत. आता धुरंधरमधील अभिनेत्री सारा अर्जुनने चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टसोबत तिने एक फोटो शेअर करत दिग्दर्शक आदित्य धर यांना धुरंधर म्हटले आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
साराने आदित्य धरचे वर्णन सोन्याचे हृदय आणि विश्वास ठेवण्याचे धाडस असलेला माणूस असे केले आहे. आदित्य खूप प्रतिभावान आहे, पण अजिबात गर्विष्ठ नाही आणि तो खूप सक्षम आहे आणि मनाने एक खरा आणि सच्चा माणूस असल्याचेही अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटले आहे. आदित्यने सेटवर इतके प्रेमळ आणि सुरक्षित वातावरण निर्माण केले की, त्यामुळे कोणतीही भीती राहिली नाही. ‘तू वादळापूर्वीची शांतता नाहीस, तू वादळ निर्माण करणारी शांतता आहेस.’ असे कौतुक करणारे शब्द साराने दिग्दर्शकाविषयी लिहिली आहेत.
View this post on Instagram
पोस्टमध्ये अभिनेत्रीने म्हटले आहे की, हा पहिला चित्रपट माझ्यासाठी केवळ एक संस्मरणीय अनुभव नव्हता, तर जीवन बदलवणारा अनुभवही होता. दिग्दर्शक आदित्य धरने साराच्या पोस्टला उत्तर देताना लिहिले की, ‘वाह सारा, तुझी पोस्ट वाचून मी खूप भावनिक झालो.” या इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक होण्याची क्षमता तुझ्यात आहे, असे आदित्यने साराविषयी म्हटले आहे.
हेही वाचा : “तुम्ही सगळे चांगले दिसता, चांगली पँट देखील घालता”; जया बच्चन ‘त्या’ विधानावरुन शत्रुघ्न सिन्हांचा टोला





