Dhurandhar2: ‘धुरंधर २’ या चित्रपटाने सध्या प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा निर्माण केली आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्राबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसत आहेत. विशेषतः अभिनेत्री सारा अर्जुन हिने साकारलेली ‘यालिना जमाली’ ही व्यक्तिरेखा सध्या सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरली आहे. ही व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यातील एका कथेतून प्रेरित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह ‘हमजा अली मजारी’ या भूमिकेत दिसतो, जो काही वास्तविक घटनांवर आधारित असल्याचं मानलं जात आहे. त्याची प्रेयसी म्हणून ‘यालिना जमाली’ ही व्यक्तिरेखा दाखवण्यात आली आहे. या भूमिकेमुळे सारा अर्जुनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. Dhurandhar2 Dhurandhar 2 Sara Arjun मात्र, काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार ‘यालिना जमाली’ ही व्यक्तिरेखा पाकिस्तानातील राजकारणी नबील गबोल यांची मुलगी ‘माहीन गबोल’ हिच्यावर आधारित असू शकते. अधिकृतपणे याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही, पण या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. माहीन गबोल ही आपल्या वडिलांच्या राजकीय जीवनापासून दूर राहणारी व्यक्ती म्हणून ओळखली जाते. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला गेला आहे की, तिचे संबंध कथित गुन्हेगारी जगाशी संबंधित उजैर बलोच यांच्या नेटवर्कमधील एका व्यक्तीसोबत होते. ही बाब समजल्यानंतर तिच्या कुटुंबाने तिला सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवण्यासाठी कुवैतला पाठवल्याचंही सांगितलं जातं. Dhurandhar2 या कथेला आणखी रंग देणारी गोष्ट म्हणजे ‘धुरंधर २’मधील आणखी एक पात्र. अभिनेता राकेश बेदी यांनी साकारलेला ‘जमील जमाली’ हा रोलही नबील गबोल यांच्यापासून प्रेरित असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, या सर्व गोष्टी केवळ चर्चेच्या पातळीवर असून, अधिकृत माहिती समोर आलेली नाही. Dhurandhar2 रिपोर्ट्सनुसार, मागील वर्षी डिसेंबर महिन्यात माहीन गबोल हिने मौला बक्स सूमरो यांच्यासोबत विवाह केला. मौला बक्स सूमरो हे पाकिस्तानातील एका प्रभावशाली राजकीय कुटुंबातून येतात. त्यांच्या कुटुंबाचा स्थानिक राजकारणात मोठा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं. Dhurandhar2 चित्रपटातील कथानकानुसार, यालिना जमाली ही आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन हमजा या भारतीय गुप्तहेरावर प्रेम करते. वयात मोठा फरक असूनही ती त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेते. ही प्रेमकथा चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावते आणि प्रेक्षकांना भावनिक पातळीवर जोडून ठेवते. एकूणच, ‘धुरंधर २’मधील यालिना जमाली ही व्यक्तिरेखा खऱ्या घटनेवर आधारित आहे का, याबाबत अधिकृत माहिती नसली तरी, या चर्चेमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. सारा अर्जुनच्या अभिनयामुळे ही भूमिका अधिक प्रभावी ठरली असून, प्रेक्षकांकडून तिचं विशेष कौतुक होत आहे.