Dhurandhar 2 trailer : धुरंधर चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये एक व्हाइब तयार करून ठेवली आहे. या चित्रपटानंतर त्याच्या सिक्वेलबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या (Dhurandhar 2 trailer ) या चित्रपटाच्या पुढील भागाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. दुसऱ्या भागाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर ट्रेलरचे कौतुक होत आहे. आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेल्या धुरंधर २ चित्रपट १९ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. आज ७ मार्च २०२६ रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात करण्यात आला. ट्रेलर पाहिल्यानंतर स्पष्ट होते की, पहिल्या भागापेक्षा अधिक डार्क आणि अधिक इंटेन्स सिक्वल असणार आहे. तसेच थरारक अॅक्शन सीन हाय-स्टेक्स ड्रामामुळे ट्रेलर प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारा ठरत आहे. Dhurandhar 2 trailer ट्रेलरमध्ये रहमान डकैतच्या मृत्यूनंतर कराचीतील ल्यारी भागात निर्माण झालेल्या अस्थिरतेची झलक दाखवण्यात आली आहे. या गोंधळात हमजा ल्यारीचा नवा ‘बादशाह’ बनताना दिसतो. या भूमिकेत रणवीर सिंह पुन्हा एकदा दमदार अवतारात दिसत आहे. यामुळे सिक्वलमध्ये रणवीरचे पात्र अधिक व्यापक स्वरुपात दाखवले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याशिवाय मेजर इक्बालच्या भूमिकेत अर्जुन रामपाल आणि अजय सान्यालच्या भूमिकेत आर. माधवन पुन्हा अॅक्शनमध्ये दिसणार आहेत. Dhurandhar 2 trailer तसेच एसपी चौधरी असलमच्या भूमिकेत संजय दत्त ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. धुरंधर २ चा ट्रेलर ३. २६ मिनिटांचा आहे. ट्रेलरमध्ये डॅागलॅाग लक्ष वेधून घेणारे आहेत. “अब पाकिस्तान का मुस्तकबिल, हिंदुस्तान तय करेगा” असा धाडसी डायलॉग अंगावर शहारे आणणारा ठरत आहे. हेही वाचा : Nayanthara and Vignesh Shivan : नयनताराने चेन्नईत केली मोठी गुंतवणूक! ‘इतक्या’ कोटींना विकत घेतला आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट