Dhurandhar 2 Review: ‘धुरंधर २’चा जलवा कायम, पण पहिल्या भागाइतका प्रभाव नाही; रणवीर सिंहची दमदार कामगिरी
Dhurandhar 2 Review : चित्रपट पाहिल्यानंतर असे लक्षात येते की हा भाग पूर्णपणे निराश करत नाही, पण पहिल्या भागाइतका प्रभावीही ठरत नाही.

Dhurandhar 2 Review: ‘धुरंधर: द रिवेंज’ हा बहुचर्चित चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल मोठी उत्सुकता होती. पहिल्या भागाच्या यशानंतर या सिक्वेलकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर असे लक्षात येते की हा भाग पूर्णपणे निराश करत नाही, पण पहिल्या भागाइतका प्रभावीही ठरत नाही.
या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून संपूर्ण चित्रपट त्यांच्याभोवती फिरतो. जवळपास चार तासांचा हा चित्रपट काही ठिकाणी रंजक वाटतो, पण मध्ये-मध्ये तो थोडा लांबलेला आणि कंटाळवाणा जाणवतो. सुरुवात आणि क्लायमॅक्स मात्र दमदार आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता टिकून राहते. Dhurandhar 2 Review
कथेच्या दृष्टीने पाहिले तर, चित्रपट सहा भागांमध्ये विभागलेला आहे. जसकीरत सिंह रांगी हा तरुण आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी गुन्हेगारी मार्गावर जातो. पुढे त्याला देशासाठी काम करण्याची संधी मिळते आणि तो पाकिस्तानमध्ये हमजा अली मजारी या नावाने गुप्तहेर म्हणून काम करतो. पुढील घटनांमध्ये त्याचा संघर्ष, बदला आणि मिशन यांची कथा उलगडत जाते. काही ठिकाणी कथा रोचक आहे, पण अनेक प्रसंग आधीच ओळखता येतात. Dhurandhar 2 Review

Dhurandhar The Revenge Movie Review
अभिनयाच्या बाबतीत रणवीर सिंह यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. अॅक्शन, भावना आणि गंभीर भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारली आहे. अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांना अपेक्षित तितकी संधी मिळालेली नाही. आर माधवन मात्र जेव्हा स्क्रीनवर येतात तेव्हा चित्रपटात ऊर्जा निर्माण होते. राकेश बेदी यांची भूमिका पुन्हा एकदा सरप्राईज ठरते. सारा अर्जुन यांना मात्र खूप कमी स्क्रीन टाइम मिळाला आहे. Dhurandhar 2 Review
दिग्दर्शनाबाबत बोलायचे झाले तर आदित्य धर यांनी पुन्हा एकदा रिसर्च आणि तपशीलांवर मेहनत घेतली आहे. नोटबंदी, अतीक अहमद आणि दाऊद इब्राहिम यांसारख्या संदर्भांमुळे कथा वास्तवाशी जोडली जाते. मात्र, पहिल्या भागातील टाईट स्टोरी आणि अनपेक्षित ट्विस्ट या भागात कमी पडतात. अनेक सीन अनावश्यक लांबवलेले वाटतात.
संगीताच्या बाबतीत हा चित्रपट थोडा कमजोर ठरतो. फारसे गाणे लक्षात राहत नाहीत आणि एक रोमँटिक गाणे जबरदस्तीने टाकल्यासारखे वाटते.
एकूणच, ‘धुरंधर २’ हा चित्रपट एकदा पाहण्यास हरकत नाही, विशेषतः जर तुम्ही पहिला भाग पाहिला असेल तर. मात्र, पहिल्या भागासारखी थरारकता आणि नवीनता या भागात कमी जाणवते. अपेक्षा कमी ठेवून पाहिल्यास हा चित्रपट ठीकठाक मनोरंजन करतो.





