Dhurandhar 2 : अभिनेता रणवीर सिंह च्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. धुरंधर २ हा सिनेमा १९ मार्चला प्रदर्शित झाला. सॅल्कनिकनुसार, या चित्रपटाने भारतात ११४४ कोटींची कमाई केली आहे, तर जगभरात १७९६ कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर पाहण्यासाठी सज्ज होणार आहे. (Dhurandhar 2 ) गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, निर्मात्यांनी नेमकी तारीख घोषित केली नव्हती. त्यामुळे तारखांबाबत प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. तसेच, धुरंधर हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला मात्र धुरंधर २ जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. Maharashtra Teacher Eligibility Test : ‘नीट’ परीक्षेमुळे ‘महाटीईटी 2026’ परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख जाहीर हिंदीसह पाच भाषांमध्ये पाहता येणार धुरंधर २ हा सिनेमा जिओ हॉटस्टारवर ४ जून २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच, हा सिनेमा हिंदीसह पाच भाषांमध्ये पाहता येणार आहे. यामध्ये तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांचा समावेश आहे. ४ जूनला हा सिनेमा संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. निर्मात्यांनी या अधिकृत घोषणा केली नसली तरी जिओ हॉटस्टारवर चित्रपट ४ तारखेला प्रदर्शित होणार असल्याचे नोटिफिकेशन पाहायला मिळत आहे. dhurandhar 2 ओटीटी प्रेक्षकांना मिळणार फायदा ? (Dhurandhar 2 ) या प्रीमियरचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांना या चित्रपटाची Uncut आवृत्तीही पाहायला मिळणार आहे. प्लॅटफॉर्मनुसार, हा चित्रपट त्याच्या मूळ आणि कोणत्याही कट (Cuts) विना फॉरमॅटमध्ये स्ट्रीम केला जाईल, ज्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटातील खतरनाक अॅक्शन आणि कथा मांडण्याची शैली तशीच अनुभवता येणार आहे, या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती आदित्य धर यांनी केलं आहे. रणवीर सिंगसोबतच या चित्रपटात आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी आणि इतर अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हेही वाचा: Maharashtra Teacher Eligibility Test : ‘नीट’ परीक्षेमुळे ‘महाटीईटी 2026’ परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख जाहीर