Dhruv Rathee: ‘ध्रुव राठीचा पासपोर्ट जप्त करा, निधीची चौकशी करावी…’ ; यूट्यूबरवर गंभीर आरोप
Dhruv Rathee: प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Dhruv Rathee: प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीचे वकील विवेक गर्ग यांनी पोलीस आयुक्त, उत्तर विभागाचे डीसीपी आणि रूप नगर पोलीस ठाण्याच्या प्रभारींकडे ही तक्रार सादर केली. या तक्रारीत , “ध्रुव राठी यांनी एका मुलाखतीत भारतीय लष्कर आणि पोलिसांना सरकारविरोधात बंड करण्यासाठी चिथावणी दिली.” करण्यात आला आहे.
तक्रारदाराचा दावा आहे की, ध्रुव राठी यांची वक्तव्ये ही देश आणि केंद्र सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न आणि कट आहे. तक्रारीत सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंचा संदर्भ देण्यात आला आहे.
ध्रुव राठी यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी Dhruv Rathee:
तक्रारदाराने ध्रुव राठी यांच्या आर्थिक स्रोतांची आणि कथित संबंधांची चौकशी करण्याची, तसेच त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली आहे. तक्रारीत भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात ध्रुव राठी यांच्या विरोधात समन्सही जारी Dhruv Rathee:
भारतात परत आल्यापासून ध्रुव राठीच्या अडचणी वाढत आहेत. यापूर्वी, दिल्लीच्या साकेत न्यायालयाने युट्युबर ध्रुव राठीविरुद्धच्या एका जुन्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात नवीन समन्स बजावण्याचे आदेश दिले होते.
हा खटला विकास संकृत्यायन, उर्फ विकास पांडे यांनी दाखल केला होता. तक्रारदाराने आरोप केला आहे की, ध्रुव राठीच्या ‘BJP IT Cell Part 2’ या व्हिडिओच्या संदर्भात हा खटला दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाने समन्सची प्रत्यक्ष बजावणी करण्यासही परवानगी दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी दिलेल्या न्यायालयाच्या आदेशानुसार, न्यायालयाने गुरुग्राममधील ध्रुव राठीच्या निवासस्थानी समन्सची नवीन बजावणी करण्यास परवानगी दिली. समन्स बजावण्यासाठी प्रोसेस सर्व्हरसोबत तक्रारदारालाही उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली.






