निवृत्तीनंतर धोनीच्या हाती येणार कमळ ?

नवी दिल्ली : विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीमध्ये भारताचा पराभव झाल्याने भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अर्ध्यावरच राहिले. हा सामना जिंकण्यासाठी कठोर प्रयत्न प्रयत्न करणारा महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना जोर धरला. मात्र धोनीने अद्याप याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी राजकारणात उतरुन भाजापासाठी राजकीय मैदानावर फटकेबाजी करणार असल्याचे संकेत बिहारमधील भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने दिले आहे.

बिहार विधानपरिषदेचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी धोनीने भाजपाचे सदस्य व्हावे यासाठी त्याच्याशी अनेकदा बोलणे झाल्याचे स्पष्ट केले आहे. असे झाल्यास, पक्षाला मोठा फायदा होणार असल्याचेही पासवान यांनी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपाने हाती घेतलेल्या जनसंपर्क अभियानाअंतर्गत पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासहीत पक्षाच्या इतर मोठ्या नेत्यांनी धोनीची भेट घेतली होती. क्रीडा, सिनेमा, शिक्षण, सांस्कृतिक कार्य अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना सोबत घेऊन काम करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. प्रत्येक क्षेत्रामधील तज्ज्ञांना सोबत घेण्याचा आमचा विचार आहे, असे पासवान यांनी सांगितले. मात्र, भाजपकडून यावर अधिकृतरीत्या कोणीही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे कॉंग्रेसनेदेखील यावर आपले मत अद्याप व्यक्‍त केले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.