धीरेंद्र शास्त्री अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात नतमस्तक ! पगडी परधान करत जाणून घेतला शीख इतिहास

नवी दिल्ली – बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) शनिवारी अमृतसर येथे पोहोचले आणि त्यांनी श्री हरमंदिर साहिब येथे नमन केले. यावेळी धीरेंद्र शास्त्री (bageshwardham) यांनी पिवळ्या रंगाची पगडी परिधान केली होती. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, मी आज पगडी घालतो, ही पंजाबची परंपरा आहे. पंजाबला येऊन खूप आनंद झाला. 21 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत पठाणकोट येथे होणाऱ्या मेळाव्याला धीरेंद्र शास्त्री उपस्थित राहणार आहेत.
शास्त्रींनी सुवर्ण मंदिरात प्रसाद अर्पण केला आणि श्री गुरु ग्रंथ साहेब यांच्या चरणी खास भेट देखील दिली. त्यांनी वाहेगुरुसमोर सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी माहिती अधिकारी अमृतपाल सिंग आणि रणधीर सिंग यांनी त्यांना शीख इतिहास आणि शीख प्रतिष्ठेची माहिती दिली. (Dhirendra Shastri in golden temple)
यावेळी त्यांच्यासोबत गायक इंद्रजित सिंग निक्कूही उपस्थित होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना बागेश्वर बाबा म्हणाले की, ते पठाणकोटमध्ये तीन दिवसीय भागवत कथा आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंजाबमध्ये आले आहेत. हा कार्यक्रम 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
श्री हरमंदिर साहिब येथे त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. ते म्हणाले की, सनातन धर्म आणि श्री गुरु ग्रंथ साहिब यांचा आशीर्वाद अबाधित राहिला पाहिजे. पंजाबी पगडी घालणे ही आनंदाची बाब आहे. गुरुंची भूमी असलेल्या पंजाबमध्ये आल्यानंतर खूप बरे वाटल्याचे त्यांनी सांगितले.





