Dharmarao Baba Atram : भाजपच्या ‘त्या’ ट्विटवर धर्मरावबाबा म्हणाले,”अजित दादा मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो”

Dharmarao Baba Atram : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविषयी रोज नाय चर्चांना उधाण येते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या भावना व्यक्त केल्या जातात. त्यासाठी अनेकदा अजित पवारांची भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी केली जातेय. आता पुन्हा राज्याचे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram)यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो, असे वक्तव्य केले आहे.
देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ महाराष्ट्र भाजपकडून ट्विट केल्यानंतर आता राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. ‘मी पुन्हा येईन’ या संदेशानंतर अनेक चर्चांना उधाण आले. त्यानंतर तासाभरानंतर ते ट्वीट डीलिट करण्यात आले आहे. याविषयी अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असताना आता धर्मरावबाबा आत्राम यांनीही याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
त्याविषयी बोलताना, “भाजपने पुन्हा येईल वाले ट्वीट मागे घेतले आहे. त्यामुळे मी या विषयावर बोलणार नाही. मात्र अजित दादा मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो आहे. राज्यात जागा वाढवण्यासाठी राज्यभर फिरत आहे. तसेच भाजपने पुन्हा येईनचं ट्विट मागे घेतलंय, त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही,” असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना आत्राम म्हणाले, अजित पवार लवकरच विदर्भाचा दौरा करणार आहे. जास्तीत जास्त जागा मिळव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीकोनातून आम्ही कामाला सुरूवात केले आहे. अजित पवारांचा प्रशासनावर चांगला वचक आहे त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत या दृष्टीकोनातून तयारी सुरू झाली आहे.”





