मुंबई – मुंबईत करोनाचा शिरकाव झाला आणि पाहता पाहता संपूर्ण मायानगरी आणि उपनगरंही याच विषाणूच्या विळख्यात होती. यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण धारावी झोपडपट्टी या भागात पाहायला मिळाल्यामुळे हा परिसर करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात होते.
मात्र नव्या आकडेवारीनुसार धारावीमध्ये करोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांमध्ये लक्षवेधी प्रमाणात कमी झाली आहेत. त्यातच नाताळच्या दिवशी समोर आलेल्या आकडेवारीप्रमाणे मागील 24 तासांत आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या या परिसरात एकही करोना रुग्ण आढळला नाही. दरम्यान, ही बातमी ऐकून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने देखील समाधान व्यक्त केलं आहे.
Christmas has brought cheer! #Dharavi reported ‘Zero’ #Covid19 positive cases. #COVID19
.@mybmcWardGN @DighavkarKiran— Ajay Devgn (@ajaydevgn) December 26, 2020
काय म्हणाला अभिनेता अजय देवगण
“क्रिसमस आपल्यासाठी आनंदाचे क्षण आला आहे. धारावीमध्ये आता एकही कोविड रुग्ण नाही.” त्याने केलेल्या या ट्विटचे सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.