धाराशिव : धाराशिवमध्ये भरदिवसा गोळीबार गोळीबार झाल्याने धाराशिव हादरलं आहे. या गोळीबारात १ जण जखमी झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील वाळू माफियांच्या दोन गटात तुफान राडा झाल्याने हा गोळीबार करण्यात आला. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूर्ववैमनस्यातून दोन गटात वाद घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? योगेश हनुमंत बुरंगे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या कमरेला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. कपिल आजिनाथ अलबत्तेच्या डोक्यात दगड घातल्याने जखमी झाला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी चैतन्य शेळकेसह दोघेजण फरार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणातील फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.