चिंबळी, (वार्ताहर) – धानोरे (ता. खेड) येथील केंद्राई मातेच्या उत्साहानिमित्त सोमवारी (दि. 18) आणि मंगळवारी (दि. 19) विविध धार्मिक कार्यक्रमांसह बैलगाडा शर्यती , कुस्ती स्पर्धाउत्साहात पार पडल्या, अशी सरपंच अनिल गावडे यांनी दिली
केंद्राई मातेच्या उत्साहानिमित्त धानोरे येथील विविध मदिराला विद्युत रोषणाई करून मंडप उभारण्यात आला होता. सोमवारी (दि. 18) मंदिरात सकाळी 7 ते 8 महापूजा, अभिषेक करून मिरवणूक काढण्यात आली.
तर सकाळी 9 ते सायंकळी 6 पर्यंत बैलगाडा शर्यती पार पडल्या. रात्री 7 ते 9 पालखा छबिना मिरवणूक काढण्यात आली. तसेच करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा ठेवण्यात होता. तर मंगळवारी (दि. 19) दुपारी कुस्ती स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या.