‘आप’चे नवनिर्वाचित खासदार संजयसिंह यांना शपथ घेण्यास राज्यसभा अध्यक्षांचा नकार

नवी दिल्ली – राज्यसभेच्या अध्यक्षांनी आम आदमी पक्षाचे नवनिर्वाचित खासदार संजय सिंह यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेण्यास अनुमती नाकारली आहे. त्यामुळे आज त्यांना शपथ घेता आली नाही. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड म्हणाले की, हे प्रकरण सध्या विशेषाधिकार समितीकडे आहे.संजय सिंह यांना दिल्ली अबकारी धोरण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
तत्पूर्वी, राऊस अव्हेन्यू न्यायालयाने शनिवारी सिंह यांना राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेण्याची परवानगी दिली होती. विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी संजय सिंह यांच्या विनंतीला मान्यता देऊन त्यांनना न्यायालयीन कोठडीत शपथ घेण्याची परवानगी दिली. सिंह यांना यापूर्वी निवडणूक अर्ज भरण्याची आणि रिटर्निंग ऑफिसरकडून सदस्यत्व प्रमाणपत्र मिळवण्याची परवानगी देण्यात आली होती.त्यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबीत आहे.





