मुंबई- अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या नंदिताच्या पात्रावर चाहत्यांनी भरभरुन प्रेम केलं. नंदिताच्या भूमिकेतून धनश्री घराघरात पोहोचली. सध्या तिने मालिका सोडली मात्र मालिकेबाबत ती सोशल मीडियावर नेहमी बोलत असते. मालिका मिळवण्यासाठी अनेकांना ऑडिशन द्यावे लागते. तिने या ऑडिशनचा व्हीडियो शेअर केला आहे.
अभिनेत्री धनश्री काडगावकरने झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला ही मालिका महत्वाच्या टप्प्यात मालिका सोडली. ती गरोदर आहे. तिचं सध्या मॅटर्निटी शुट प्रचंड व्हायरल होत आहे.
माझ्या जीवनात आता त्यापेक्षाही महत्वाचा क्षण(इथे तिला गरोदरपणाबद्दल सांगायचं होते) अाला आहे. त्यामुळे मी हे पात्र नाही करू शकणार. माझ्या ऐवजी माधुरी पवार ही अभिनेत्री आता हे पात्र साकारणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की जसे तुम्ही मला प्रेम, आशिर्वाद दिलात, तसेच प्रेम तिलाही द्या, असे तिने मालिकेबाबत बोलताना सांगितले.
धनश्रीने जरी गरोदरपणामुळे मालिका सोडली असली तरी तीचे मालिकेवरील प्रेम कमी झाले नाही, असे तिच्या बोलण्यावरून दिसते. मालिकेत जरी तिने खलनायिकेची भूमिका साकारली असली तरी तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला होता. नवीन नंदिता देखील प्रेक्षकांना तितकेच मनोरंजन करेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.