Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसणारे मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कट रचल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जालना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणात एका बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला होता. आज मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी हा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, माझ्या हत्येचा कट रचण्यात धनंजय मुंडे यांचा हात होता. त्यामुळे त्यांची चौकशी करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. माझ्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली होती. जेवणात विष टाकून, मला औषध देऊन किंवा गाडीचा अपघात करून मला मारण्याचा कट रचण्यात आला होता असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. आता मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांनी हत्येच्या कटाचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, ‘राज्यातील जनतेसमोर एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोर. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी तो मेळावा घेतला. राज्यात जातीय वातावरण कोण तयार केले. बीड जिल्ह्यात ओबीसी मधल्या अनेकांची घर जाळली ही प्रवृत्ती कोणाची, असं धनंजय मुंडे म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले, मला तलवारीने मारायला येणाऱ्याची मी गळाघेट घेतली. जरांगे यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावं. तुमची तयारी कधी? EWS मध्ये जास्त आरक्षण. तुम्ही हाके यांना मारलं, तुम्ही वाघमारेंना मारलं ही प्रवृत्ती कुणाची. माझा त्यांचा बांधला बांध नाही. मी कट कशाला करू,असंही त्यांनी यावेळी म्हटलं. ‘जरांगे शिवीगाळ करणार का? घरात इंग्रज आले होते का? असे प्रश्न बोलतात. आमची देखील मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ओबीसीमधून नाही. AI ने आज काही तयार करतात. मनोज जरांगे यांना या सगळ्या गोष्टी महागात पडतील. मी जीवनात पहिल्यांदा ओबीसी मेळाव्यात गेलो. अनेकदा मला बाकीच्यांनी हकलून काढलं, असं धनंजय मुंडे यांनी सांगितले. काय म्हणाले होते मनोज जरांगे ? बीडच्या मोठ्या नेत्याच्या पीए की कार्यकर्ते यांनी मिळून हत्येचा कट रचला. त्यामागे धनंजय मुंडे होते, असा अत्यंत गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांनी भेट घेत कसा मारायचं याचा प्लॅन केला. गाडीने गाडी धडकून मारू, असा प्लॅन झाला. त्यासाठी परराज्यातील पासिंग असलेली गाडी देण्याची तयारी धनंजय मुंडे यांनी दाखवली, असेही जरांगे यांनी सांगितले. बीडचा एका मोठ्या नेत्याची पीए की कार्यकर्ता तो आरोपींकडे गेला. येथून घटनाक्रम सुरू झाला, अशी धक्कादायक माहिती मनोज जरांगे यांनी दिली. कांचन नावाचा माणून धनंजय मुंडेचा पीए आहे. तो आरोपांनी धनंजय मुंडे यांच्याकडे घेऊन गेला, असेही त्यांनी सांगितले.