धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक संबंध; अंजली दमानियांनी थेट पुरावेच दाखवले

Anjali Damania | बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात या प्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली आहे.
आता या प्रकरणावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी ट्विट करुन मुंडे आणि कराड यांच्या जमिनीचा सात बारा शेअर केला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन !
हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे.
कंपनी एकत्र, जमीन एकत्र
जगमित्र शुगर्स चे ६ सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले
३५५४ गुंठे जमीन (८८ एकर ३४ गुंठे) pic.twitter.com/afpORBwTRh
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 23, 2024
अंजली दमानिया यांची पोस्ट
मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. याबाबत त्यांनी डिजिटल सात बारा शेअर केला आहे. पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन ! हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे. कंपनी एकत्र, जमीन एकत्र , जगमित्र शुगर्स चे ६ सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले. ३५५४ गुंठे जमीन (८८ एकर ३४ गुंठे).” असंही दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे, संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करण्यासाठी २८ तारखेला त्या ठिय्या आंदोलन करणार आहे. Anjali Damania |
नेमकं प्रकरण काय ?
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव सातत्याने समोर येत असून तोच सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. वाल्मिक कराडला सरकारमधूनच संरक्षण मिळत असल्याचाही आरोप होत असून त्यात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जात आहे. मात्र धनंजय मुंडेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. Anjali Damania |
हेही वाचा:
शेख हसीना मायदेशी परतल्यानंतर त्यांच्यासोबत काय होणार? ; काय सांगतो बांगलादेशचा कायदा? जाणून घ्या





