पुणे जिल्हा | रयतकडून धामणी शाळेचा ‘आदर्श विद्यालय’ पुरस्काराने सन्मान

लोणी धामणी, (वार्ताहर) – धामणी (ता.आंबेगाव) येथील शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज (सायन्स)ला रयत शिक्षण संस्थेकडून ‘आदर्श विद्यालय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रविवार (दि.२२) रोजी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्ताने सातारा येथे पार पडलेल्या जयंती सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार,
खासदार श्रीनिवास पाटील, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, उपाधक्ष भगीरथ जाधव, संघटक डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे.
शिवाजी विद्यालयात वर्षभरात विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. त्यामुळे उपक्रमशील शाळा म्हणून हा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याने धामणी, पहाडदरा, शिरदाळे,ज्ञानेश्वर वस्ती ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
या वेळी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी डी. आर. गायकवाड, स्थनिक स्कूल कमिटी सदस्य ज्ञानेश्वर विधाटे, वसंत जाधव, प्रभारी मुख्याधापक पोपट शेंडकर, लक्षण कोकाटे, माजी विद्यार्थी शांताराम जाधव, प्रा. वाल्मीक कातळकर, रवींद्र जोशी उपस्थित होते

