नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मोठा दिलासा ; देवयानी फरांदे यांच्या विरोधातील दोन मोठ्या उमेदवारांची माघार

Devyani Pharande । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतीळ आजचा दिवस सर्वच पक्षासाठी महत्वाचा आहे. कारण आज राज्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यातच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातुन महायुतीसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. या ठिकाणच्या दोन बड्या नेत्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी अर्ज दाखल केला होता. महायुतीने भाजप आमदार देवयानी फरांदे यांना उमेदवारी घोषित केली असताना रंजन ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरल्याने नेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
रंजन ठाकरेंच्या उमेदवारीने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली होती. तर मनसेकडून जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मनसेच्या उमेदवारीमुळे भाजप आमदार देवयानी फरांदे यांना फटका बसणार, असे बोलले जात होते.
रंजन ठाकरे माघार घेणार Devyani Pharande ।
आता नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे माघार घेणार आहेत. रंजन ठाकरे दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. महायुतीमधील मतविभाजन टाळण्यासाठी वरिष्ठांच्या सुचनेनंतर रंजन ठाकरे यांच्या माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अंकुश पवारही घेणार माघार Devyani Pharande ।
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अंकुश पवार हे देखील माघार घेणार आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अंकुश पवार यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर अंकुश पवार उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. मनसेचा कल महायुतीच्या बाजूने असल्याने देवयानी फरांदे यांना फायदा होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा
अखेर बंडखोरी थंडावली ! गोपाळ शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज मागे ; विनोद तावडेंच्या प्रयत्नांना यश





