गुरुग्राम – देवाचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यात सध्या हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील सुनारिया कारागृहात २० वर्षांचा कारावास भोगतोय.
येत्या राखी पौर्णिमानिमित्य गेल्या 19 दिवसांत राम रहिमला 25 हजारांहून अधिक राखी पोस्टाने पाठवण्यात आल्या आहेत. या राख्या पोस्टाने पाठविण्यात आल्या आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, रविवारी राखी देण्यासाठी डाक विभागानं विशेष वितरण सेवा सुरू केली आहे. यात आता पर्यंत 1 ते 19 ऑगस्टपर्यंत टपाल खात्यानं 2.95 लाख राखी वितरित केल्या आहेत, तर गेल्या वर्षी 2.78 लाख राखी वितरित केल्या होत्या. यामध्ये राम रहिमला 25 हजारांहून अधिक राखी पोस्टाने पाठवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, गुरमीत राम रहीम सिंग याला २५ ऑगस्ट २०१७ रोजी दोन महिला शिष्यांचा बलात्कारप्रकरणी २० वर्षांचा कारावास तर सिरसा येथील पत्रकार राम चंदेर छत्रपती यांच्या खुनप्रकरणी जन्मठेप सुनावण्यात आली आहे.