नांदेड : भाजपचे संकटमोचक अशी प्रतिमा असणारे गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत एक मोठे विधान केले आहे. भाजपमध्ये एकच चेहरा आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, जर भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर देवेंद्रजी होतील. पक्षश्रेष्ठीना सर्व अधिकार आहेत. पण आमच्या मनातला मुख्यमंत्री भाजपचा असेल तर तो म्हणजे देवेंद्रजी असतील असं वक्तव्य राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले गिरीश महाजन ? एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे पक्ष सोडून गेले, त्यांच्या पत्नी दूध डेअरीमध्येही निवडून आल्या नाहीत. आमचे चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण हे 150 किलोमीटर लांब जाऊन त्यांच्या मतदारसंघात जाऊन उभे राहिले. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी खडसे वहिनीचा पराभव केला. त्या दूध डेअरीवर चेअरमन होत्या. जिल्हा बँकेवर त्यांचं काही राहिलं नाही. विधानसभेला कन्यापण त्यांच्या पडल्या. पक्ष हा पक्ष आहे. कोणी येणं जाणं चालू राहील. ज्यांना आजमवायचं आहे त्यांनी आजमावावं.असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत. मराठा आरक्षणावर काय म्हणाले? मला वाटतं जे नियमात आहे तेच सरकार करू शकतं. नियमबाह्य काहीही करू शकत नाही आणि कोर्टही त्याला मान्यता देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, प्रामाणिक भूमिका आहे असे गिरीश महाजन यावेळी म्हणाले.