माहिम : यंदा माहीममध्ये हायहोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि मनसे या 3 पक्षात ही लढत होणार आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदेनी सदा सरवणकर यांना तिकीट दिले आहे तर उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना तिकीट दिले आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी आपला मुलगा अमित ठाकरे याला या माहिम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता या पाठिंब्याची बिनशर्त परतफेड करण्यासाठी अमित ठाकरे यांच्यासाठी महायुती आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, सर्व प्रयत्न अपयशी ठरले. यानंतर आता फडणवीसांनी सदा सरवणार यांच्या बाबत मोठा निर्णय घेतला आहे. माहीम विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांचा प्रचार करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी माहीम विधानसभा मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांना दिले आहे. सदा सरवणकर यांना दिलासा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सदा सरवणकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे अमित ठाकरेंसाठी ही निवडणूक जड जाणार आहे. यामुळे आता या मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.