Devendra Fadnavis : देशात अराजकता निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका
नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका किंवा पाकिस्तानसारखी अराजकता देशात निर्माण करून नवीन व्यवस्था आणायची आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

Devendra Fadnavis : कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांना केवळ सरकार बदलायचे नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे प्रस्थापित केलेली लोकशाही व्यवस्था मोडीत काढायची आहे. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका किंवा पाकिस्तानसारखी अराजकता देशात निर्माण करून नवीन व्यवस्था आणायची आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
बेळगाव येथे आयोजीत एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. यावेळी सुधारित ‘डिलिमिटेशन विधेयक २०२६’वर आपली भूमिका स्पष्ट करत राहुल गांधीवर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेस आणि विरोधी पक्ष सरकार नव्हे तर देशाची व्यवस्था आणि संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी संविधान आणि डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून रोज खोटे बोलून संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.






