Gunaratna Sadavarte : “जातीय आकसापोटी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य, तरी एकनाथ शिंदे…”; गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
Gunaratna Sadavarte : माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासहित मराठा समाजातील इतर नेते यामध्ये सक्रिय आहेत. या आंदोलनाला सत्तेतील आणि सत्तेबाहेरील मराठा समाजाचा थेट पाठिंबा आहे, असा थेट आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

Gunaratna Sadavarte : जातीय आकसापोटी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. मनोज जरांगे हा एक प्यादा आहे. तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सेवक आहे. जरांगे मुख्यमंत्र्यांच्या घराला टार्गेट करण्याची भाषा करतो तरी एकनाथ शिंदे मूग गिळून गप्प बसले आहेत. फक्त एकनाथ शिंदे नाहीतर सत्तेतील इतर मंत्री विखे-पाटीलही मवाळपणे बोलतात. विखे-पाटील यांनी कधीच मनोज जरांगे पाटील यांचा निषेध केला नाही, असा थेट हल्लाबोल अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
मनोज जरांगे आजपासून अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला बसणार आहेत. हे आंदोलन निर्णायक असल्याचे त्यांनी यापूर्वी जाहीर केले होते. या आंदोलनावर बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी एक मोठं वक्तव्य केले. ते म्हणाले मनोज जरांगे यांचे हे आंदोलन विशिष्ट राजकीय कारणासाठी होत आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिगर मराठा समाजामधील आहेत. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सत्तेतील आणि सत्तेबाहेरील मराठा समाजाचा थेट पाठिंबा : सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटी आणि मुंबईत यापैकी कुठेही आंदोलन करुन देऊ नका. पोलिसांनी मंत्रालयातील कोणाचीही वाट बघू नका. या प्रकरणात कायद्यांना आणि धमक्यांना जास्त गांभीर्याने घ्यावे, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात राजकीय व्यक्ती देखील सक्रिय आहेत. माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासहित मराठा समाजातील इतर नेते यामध्ये सक्रिय आहेत. या आंदोलनाला सत्तेतील आणि सत्तेबाहेरील मराठा समाजाचा थेट पाठिंबा आहे, असा थेट आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
मनोज जरांगेंचे आवाहन
मराठा समाजाला आवाहन करताना मनोज जरांगे म्हणाले “समाजाने घरात बसू नये ज्यांनी अर्ज केले त्यांनी अंतरवालीत येऊन अर्ज द्यावे. समाजाने मरगळ झटकून टाकावी व एकत्र यावे. ज्यांची नोंद सापडली पण प्रमाणपत्र दिले नाही अशा लोकांनी देखील अर्ज द्यावेत. मराठ्यांनी नोंद घेऊन घरी झोपू नये, अंतरवालीत यावे. ज्या मराठ्यांच्या निवडी झाल्या पण नियुक्त्या दिल्या नाही त्यांनीही अंतरवालीत येऊन अर्ज द्यावे.” त्यामुळे जरांगे यांच्या या आवाहनाला आता मराठा समाज कसा प्रतिसाद देतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
मनोज जरांगे आजपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरूवात करत आहेत. रात्री पोलिसांकडून आंदोलनात कायदा सुव्यवस्था आणि नियमांचे पालन करण्यासंबंधी मनोज जरांगे यांना प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली.
मनोज जरांगेंच्या मागण्या कोणत्या?
- ५८ लाख नोंदीचे प्रमाणपत्र व्हॅलीडिटी द्या. हे प्रमाणपत्र कसे देणार हे अधिकाऱ्यांनी मला अंतरवालीत येऊन सांगावे.
- सातारा, कोल्हापूर, औंध पुणे गॅझेटचा जीआर हवा.
- बलिदान गेलेल्या कुटुंना पात्रतेनुसार नोकऱ्या द्या.
- स्वतंत्र मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करा.
- सारथीच्या बंद केलेल्या योजना सुरू करा.
- आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याजाचे परतावे द्या.
- मराठवाड्यातील ४ रद्द करण्यात आलेले जात प्रमाणपत्र वैध करुन द्या.
Bhor News: ‘आंदोलन केलं तरी घाम फुटेना!’ भोरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; पुन्हा आंदोलनाचा इशारा






