Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीत झालेल्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात(Devendra Fadnavis) मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. अजित पवारांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली असून, पक्षाचे विधिमंडळ गटनेतेपद आणि उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार, याची चर्चा जोर धरू लागली आहे. उद्या सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधिमंडळ गटनेते पदासाठी नव्या नेत्याची निवड केली जाणार आहे. पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांच्या नावाला पाठिंबा देत आहेत. सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळ गटनेते म्हणून निवड झाल्यास, त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. हे घडल्यास महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळेल, ही ऐतिहासिक घटना ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, त्याला आमचा पाठींबा आहे. अजितदादांचे कुटुंब असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. त्यांचे जे काही निर्णय होतील, त्यांना आमचे समर्थन असेल. राष्ट्रवादीचे नेते माझ्याशी दोन वेळा चर्चा करून गेले आहेत. Devendra Fadnavis | त्यांनी त्यांची कार्यपद्धती, उपलब्ध ऑप्शन्स याबाबत बोलले. मात्र, अंतिम निर्णय पक्ष घेईल, त्याबाबत मी बोलणे योग्य होणार नाही.” फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या निर्णयाला भाजप पक्ष आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. यामुळे महायुतीतील सहकार्य कायम राहील, असे संकेत मिळत आहेत. अर्थसंकल्प कोण सादर करणार? अजित पवार हे अर्थमंत्रीही होते. त्यांनी राज्याचा आगामी अर्थसंकल्पाची सर्व तयारी केली होती. फडणवीस म्हणाले, “अर्थसंकल्पाची सगळी तयारी अजितदादांनीच केली होती. आता मी स्वतः त्यात लक्ष घालून प्रक्रिया पूर्ण करणार आहे. त्यानंतर आम्ही ठरवू की अर्थसंकल्प कोण सादर करायचा.” महापौर पदाच्या निवडणुका महापौरांच्या निवडणुकीबाबत फडणवीस म्हणाले, “महायुतीच्या त्या-त्या पक्षांची चर्चा झाली आहे. मुंबई किंवा इतर शहरातील महापौरांसंदर्भात नावे आली आहेत. उद्या-परवा चर्चा करून अंतिम नावे ठरतील. महानगराचे अध्यक्ष, आमदार योग्य निर्णय घेतील. नागपूरच्या महापौर संदर्भातही ओव्हरऑल चर्चा झाली आहे. त्या-त्या ठिकाणच्या प्रमुखांशी बोलून निर्णय घेतला जाईल.” हे पण वाचा : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी जवळपास निश्चित; पक्षप्रमुख अन् अर्थखातं कोणाकडे, मोठी माहिती समोर